गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पिंपर येथे शिवजयंतीनिमित्त 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, शिवपूजा, शिवआरती, वक्तृत्व स्पर्धा, बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Shiv Jayanti program at Pimpar
यानिमित्त उद्या दि. 17 रोजी रात्री 10 वा. पुणे येथील युवा शाहिर श्रीकांत अनिल शिर्के यांचे पोवाडा सादरीकरण होणार आहे. यावेळी ‘कथा शिवरायांच्या पराक्रमाची, गाथा राष्ट्र गौरवाची’ या विषयावर संपन्न होईल. सदर कार्यक्रम पिंपर मधील मारुती मंदिर येथे पार पडेल. तरी या कार्यक्रमाचा तालुक्यातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. Shiv Jayanti program at Pimpar