संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शीर नं.१ या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मंत्रिमंडळ प्रतिनिधी कुमारी पूजा मोरे हिच्या अध्यक्षतेखाली उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. Shiv Jayanti celebrated at Sheer School
प्रथम शिवरायांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गावातून शिवरायांचा जयजयकार करत प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर सभेचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर भाषणे केली. शाळेतील शिक्षक अजय खेराडे यांनी शिवरायांच्या राज्यकारभारातील अचूक नियोजनाबाबत सांगताना विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात अचूक नियोजन करावे, असे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समतेची भावना ठेवून कशाप्रकारे राज्य कारभार केला. जो देशात परदेशात महान विभूतींना कसा आदर्शवत ठरला याची माहिती दिली. तसेच ग्राम विकास अधिकारी एम. आर. देवकाते यांनी शिवजयंतीचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. शीर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय धोपट यांनी छत्रपती शिवरायांचे प्रत्येक गुण विद्यार्थ्यांनी अंगी बाणून आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावे असे आवाहन केले. Shiv Jayanti celebrated at Sheer School


यावेळी शीर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय धोपट, उपसरपंच रामचंद्र पवार, माजी उपसरपंच अमित साळवी, ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा आंबेकर, ग्रामविकास अधिकारी एम आर देवकाते, गावातील सर्व आशा सेविका व शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच गुहागर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी आर. एच. गळवे यांनी भेट देऊन सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन आयुष गुरव याने केले. Shiv Jayanti celebrated at Sheer School