गुहागर, ता. 19 : रत्नागिरीचे सुपुत्र आणि श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांना राज्यस्तरीय “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव- 2023 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी संजीवनी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य ह्या राज्यस्तरीय संस्थेकडून पुरस्कारासाठी निवड झाली आहे. Shiv Chhatrapati Maharashtra Gaurav Award to Lokre
संजीवनी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्यचे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर वसंतराव सानप व राज्यस्तरीय समितीकडून अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे. Shiv Chhatrapati Maharashtra Gaurav Award to Lokre

या पुरस्काराचे वितरण दि. 3 जून रोजी आण्णाभाऊ साठे सभागृह सिन्नर जि. नाशिक येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभाला श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले अध्यक्ष-स्वराज्य संघटना, महाराष्ट्र राज्य, ना. निलमताई गोर्हे सभापती-विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, ना.नरहरी झिरवळ उपाध्यक्ष-विधानसभा, महाराष्ट्र राज्य, आमदार बाळासाहेब थोरात माजी महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य, ना.रूपालीताई चाकणकर अध्यक्ष-राज्य महिला आयोग, खा.श्रीकांत शिंदे सदस्य-कल्याण लोकसभा, पद्मश्री पोपटराव पवार आदर्श सरपंच, हिवरे बाजार, पद्मश्री राहीबाई पोपेरे बीजमाता, आ.रोहीत पवार, आ. ऋतुराज पाटील, आ. सत्यजित तांबे, मा. संजय आवटे संपादक-लोकमत पूणे, मा. राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी, नंदुरबार इ.मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. Shiv Chhatrapati Maharashtra Gaurav Award to Lokre
श्री स्वामी दत्त फाऊंडेशन आणि श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात अविरत वेगवेगळे उपक्रम लोकांपर्यत पोहोचवून अंधश्रद्धा निर्मुलन करून सनातन वैदिक मंत्राचा प्रचार व प्रसार करत आहेत तसेच श्री स्वामी दत्त बैठक-आरतीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्यसुद्धा करत आहेत. ह्याआधी डॉ. श्री. शंकर लोकरे ह्यांना 37 राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. Shiv Chhatrapati Maharashtra Gaurav Award to Lokre
