गुहागर, ता. 3 : चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील नांदिवसे गावचे सुपुत्र श्री. शशिकांत विठ्ठलराव शिंदे यांना महसूल दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार एस. पी. श्री. गर्ग साहेबांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बी. एम. पाटील, मुख्याधिकारी सौ. जाखड मॅडम, रत्नागिरी पोलिस वरिष्ठ अधिकारी, चिपळूण प्रांत अधिकारी प्रवीण पाटील, चिपळूण तहसीलदार जयराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते. Shinde is the best driver

शशिकांत शिंदे काही वर्षे गुहागरला तहसीलदार कार्यालयात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. सध्या चिपळूण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात ते सेवेत आहेत. सन 2021-22 या महसुल वर्षात उत्तम सेवा दिल्याबद्दल महसुल दिनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शशिकांत शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Shinde is the best driver

