उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीने मिळाले बळ
गुहागर ता. 06 : शिवसेना फुटीनंतर गुहागरातील शिवसैनिक शिंदे गटात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी गुहागर दौऱ्यावर येऊन येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतल्याने गुहागरातही शिंदे गट सक्रिय होण्याच्या चर्चेवर शिक्कमोर्तब झाले आहे. येत्या काही दिवसातच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. Shinde group active in Guhagar
रविवारी गुहागरातील एकही कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नाही, असा दावा तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी केला होता. मात्र शिवसेनेतील एक गट आ. भास्कर जाधव यांच्यावर पूर्वीपासूनच नाराज होता. शिवसेनेतील बंडाळी नंतर हा गट योग्य संधीची वाट पहात होता. तोपर्यंत जाहीर रित्या या जाहिर गटाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. ना. सामंत यांच्या भेटीमुळे या गटाला बळ मिळाले आहे. आता या संधीचा फायदा घेऊन उद्योगमंत्री सामंत आणि जेष्ठ नेते (शिंदे गट ) रामदासभाई कदम गुहागरातही शिंदे गटाचे प्राबल्य कसे वाढवितात हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. Shinde group active in Guhagar
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करून सेनेचे ४० आमदार व अन्य अपक्ष आमदार यांच्या मदतीने महविकास आघाडी सरकारला खाली खेचत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. Shinde group active in Guhagar
महाडचे भरत गोगावले, दापोलीचे आ. योगेश कदम व रत्नागिरीचे आ. उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात केवळ गुहागरचे आ. भास्कर जाधव आणि राजापूरचे आ. राजन साळवी हे दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत शिल्लक राहिले आहेत. दोन आमदार शिंदे गटात गेल्यामुळे जिल्ह्याची संघटनात्मक मोठी जबाबदारी आता भास्कर जाधव यांचावर येऊन पडली आहे. ठाकरे यांनी आ. जाधव यांची नुकतीच नेतेपदी निवड केली आहे. आ. जाधव गुहागर विधानसभा व अन्य मतदार संघात मेळावे घेत शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा व तेथील शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न आ. जाधव करत आहेत. तसे बघायला गेले तर शिवसेनेत आ. जाधव यांच्यासारखा लढवय्या नेता कोणी नाही. त्यामुळे जाधव मिळालेल्या पदाला योग्य न्याय देतील, असा तालुक्यातील शिवसैनिकांना विश्वास आहे. Shinde group active in Guhagar
आ. जाधव यांनी दोनच दिवसांपूर्वी शृंगारतळी येथे मेळावा घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. आणि सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शृंगारतळीत येऊन शृंगारतळीच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील एका हॉटेलमध्ये गुहागरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. तसेच काहीवेळ चर्चाहि झाली. यावेळी ना. सामंत यांच्यासोबत गुहागर शिवसेनेचे जुने शिवसैनिक उपस्थित होते. या भेटीमुळे गुहागरातही शिंदे गट सक्रिय होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आ. जाधव यांच्यासमोर पुन्हा जुना – नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Shinde group active in Guhagar