• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणातील पारंपरिक खेळ्यांचा विरारमध्ये जल्लोष

by Mayuresh Patnakar
March 11, 2023
in Maharashtra
533 5
0
Shimgya in Konkan rejoices in Virar
1k
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.11 : “हाय रे हाय आणि … च्या जीवात काय नाय रे… होलियो!” हे शब्द कानावर पडले की कोकणी माणसाच्या अंगात काही वेगळंच बळ संचारतं. ढोल ताशांचे आवाज कानात घुमू लागतात. आपले देव साक्षात आपल्या दारी येतायत ही भावना मनामध्ये एका विलक्षण ऊर्जेची निर्मिती करते. संकासुर, खेळे, गोमू, दशावतार, नमन आणि मृदूंगावर पडणारी लयबद्ध थाप सगळं काही क्षणात डोळ्यासमोर थैमान घालू लागतं. खरंच शिमगा म्हटलं की, नव्या जल्लोषाची पाने कोकणी माणसाच्या आयुष्याला जोडली जातात. Shimgya in Konkan rejoices in Virar

हाच शिमगोत्सव कारगिल नगर विरार पूर्व येथे गुहागर मधील सर्व ग्रामस्थ मिळून दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी होळी निमित्त कोकणचे खेळे सर्वांना पाहायला मिळाले. हे ग्रामस्थ विरारमध्ये विविध भागात राहत असून होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येतात. पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतुने कोकणचे खेळे हा जग प्रसिध्द असलेला खेळ आता कोकणातच नाही. तर गेली ५-६ वर्षापासून विरार मध्ये देखील पाहायला मिळतो. Shimgya in Konkan rejoices in Virar

होळी, धुळीवंदन अर्थात शिमगोत्सव. यंदा वसईत एक गाव एक होळीकोत्सव असे चित्र पहायला मिळाले. शिमगा म्हणजे कोकणच असे एक समिकरणाचे खऱ्या अर्थाचे दर्शन विरारमध्ये पहायला मिळाले. ह्यामध्ये गोमू आणि सांकासुर हे आकर्षण असते परंतु कोकणात ह्यांना देवाचे स्थान दिले जाते त्यामुळे ते एक देवाचे रूपच जणू. गाण्याच्या तालावर आणि सकासुर नाचतात, आरती करतात आणि देवाला गाऱ्हाणे बोलतात. मंगळवारी विरारमध्ये कोकणी बांधवांकडून शिमगोत्सवाचा पारंपारिक ठसका अनूभवायला मिळाला. तसेच एकमेकांना रंग लावून होळी सणाचा आनंदही लुटला. Shimgya in Konkan rejoices in Virar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShimgya in Konkan rejoices in VirarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share418SendTweet262
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.