संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17: तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाई देवी यांच्या तिन्ही बहिणींच्या पालखी गळाभेटीचा सोहळा रंगला. यावेळी दोन्ही पालखींच्या आतील नारळांची आपोआप अदलाबदल होते. अशी अख्यांकीका सांगण्यात येते. आबलोली खालील पागडेवाडी येथील मानकरी नऊ दिवस देवीच्या नावाने कडक उपवास करतात. हे मानकरी नवलाई देवीच्या पालखी समोर सहाणेवर धारदार शस्त्राने स्वतः च्या उघड्या अंगावर हाणून घेतात, मात्र यावेळी कुठल्याही प्रकारची त्यांना इजा होत नाही की, साधे खरचटतही नाही आणि रक्तही येत नाही. या पालखीभेट सोहळ्याला पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती. Shimgotsav at Aabloli and Khodde


आबलोली खालील पागडेवाडी येथील मानकरी १) दत्ताराम गोणबरे, २) रमेश पांडुरंग गोणबरे, ३) सुरेश गोविंद गोणबरे, ४) दिलीप गोणबरे, ५) प्रभाकर गोणबरे, ६) रमेश गोविंद गोणबरे, ७) प्रमोद रामचंद्र गोणबरे हे आहेत. Shimgotsav at Aabloli and Khodde


फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर आबलोली – खोडदे येथील होम पेटविले जातात आणि दुपार नंतर आबलोली येथील श्री. नवलाई, खोडदे गणेश वाडी येथील श्री.नवलाईदेवी, खोडदे सहाणेचीवाडी येथील श्री. नवलाईदेवी या तिन्ही पालख्या या तिन्ही बहिणी आपल्या लाडक्या भावाला गोपाळजीला भेटून आल्यानंतरच आबलोली येथील कै.दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानावर नाचविण्यात येतात याचवेळी दुपार नंतर सहाणेवर जत्राही भरते. विशेष म्हणजे आबलोली येथील श्री. नवलाईदेवीच्या पालखीला खोडदे येथील श्री. नवलाईदेवीच्या पालख्या क्रमाक्रमाने भेटतात या बहिणींची गळाभेट घेताना या देवतांमध्ये बहिणींच नातं असल्याचे ग्रामस्थ आवर्जून सांगतात. Shimgotsav at Aabloli and Khodde


यावेळी दोन्ही गावातील लोक आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेणाऱ्या भक्तांना उचलून घेतात आणि गावातील ग्रामस्थांच्या खांद्यावर उभे असलेल्या ग्रामस्थांच्या खांद्यावरील पालख्या वाजत – गाजत ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिष बाजीत एकमेकांची गळाभेट करतात व पालख्यांचीही गळाभेट होते. श्री. नवलाईदेवीच्या बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूला ग्रामस्थ नाचवित असतात पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदेवतला भेटते. हा सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे. या शिमगोत्सवाचे युट्युब वर संपूर्ण प्रक्षेपण नवलाई इव्हेंट या बेबसाईटवर दाखविण्यात आले आहे. Shimgotsav at Aabloli and Khodde