शृंगारतळीतील दवाखान्यात मुलांना ॲडमिट करण्याची सोय
गुहागर, ता. 30 : डॉ. सौ. स्मिता बळवंत यांनी गुहागर मधील ओम बाल रुग्णालय या दवाखान्याचे शृंगारतळीमध्ये स्थलांतर केले आहे. शृंगारतळीतील पोलीस चौकीच्या बाजुला असलेल्या मालाणी मार्केटमध्ये स्थलांतरीत केलेल्या दवाखान्याचे नांव बळवंत क्लिनिक आहे. या दवाखान्यात लहान मुलांना ॲडमिट करण्याची सोय देखील डॉ. बळवंत यांनी उपलब्ध करुन दिली आहे. Shifting of Balwant’s Hospital

डॉ. सौ. स्मिता बळवंत या बालरोग तज्ञ आहेत. गेले काही वर्ष गुहागर बाजारपेठेतील सिताराम कॉम्प्लेक्स मध्ये ओम बाल रुग्णालय हा दवाखाना होता. लहान मुलांसाठीचा दवाखाना म्हणून या दवाखान्याची ओळख बनली होती. तालुक्यातील विविध गावांमधुन पालक आपल्या मुलांना या दवाखान्यात घेवून यायचे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या दवाखान्याची जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे शृंगारतळी येथे मोठ्या जागेत डॉ. सौ. बळवंत यांनी आपल्या दवाखान्याचे स्थलांतर केले आहे. Shifting of Balwant’s Hospital

शृंगारतळीतील दवाखान्याचे नाव बळवंत क्लिनिक असे आहे. शृंगारतळीतील पोलीस चौकीच्या बाजुला असलेल्या मालाणी मार्केटमध्ये हा दवाखाना आहे. बळवंत क्लिनिकमध्ये लहान मुलांबरोबर महिलांवर देखील उपचार होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या क्लिनिकमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. येथे मुलांना ॲडमिट करण्याची व्यवस्था आहे. या कक्षात तातडीच्या व अत्याधुनिक सेवा 24 तास उपलब्ध असणार आहेत. गुहागर तालुक्यात केवळ लहान मुले आणि महिलांसाठी रुग्णसेवा देणारा हा दवाखाना आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देता यावी म्हणून रुग्णांनी किंवा लहान मुलांच्या पालकांनी आधी वेळ निश्चित करुन (Appointment घेवून) यावे. त्यासाठी 8412992261 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन बळवंत क्लिनिकने केले आहे. Shifting of Balwant’s Hospital
