रत्नागिरी, ता. 08 : कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शारदोत्सवाची उत्साहात सांगता झाली. घटनस्थापनेपासून ९ दिवस दररोज नियोजनपूर्वक विविध कार्यक्रम, उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांच्या सहकार्याने हे कार्यक्रम उत्साहात करण्यात झाले. Sharadotsav at Aagashe Vidyamandir

यावेळी माजी विद्यार्थी हभप कौस्तुभ फाटक यांनी कीर्तन केले. त्यांना विघ्नेश घाणेकर व शंतनू सावंत यांनी अनुक्रमे तबला व हार्मोनियम साथ केली. पालकांसाठी आयोजित सुशोभन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नीलेश गावडे यांनी मनमोहक पानाफुलांची रांगोळी काढून उत्सवात शोभा वाढवली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी देवीसमोर आरती, अभंग सादर केले. वर्गावर्गात पाटीपूजन करण्यात आले. गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन स्मृतीप्रीत्यर्थ रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. Sharadotsav at Aagashe Vidyamandir

यावेळी सौ. मुळ्ये यांनी साहित्य, साहित्यिक म्हणजे काय, तुम्ही सुद्धा लिखाण करत राहा, असे सांगितले. श्री. बर्वे यांनी जवान, शेतकऱ्यांविषयी आदरभावना व्यक्त करून भारतमातेला विसरू नका, असे सांगितले. बालकमंदिरच्या शिक्षिका धनश्री मुसळे यांना लायन्स क्लबचा शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. Sharadotsav at Aagashe Vidyamandir

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १४० विद्यार्थी सहभागी झाले होते. याचे परीक्षण सौ. अलका बेंदरकर, प्रफुल्ल घाग यांनी केले.व पालकांना नाट्यछटेविषयी मार्गदर्शन केले. पालकांसाठी पानाफुलांची रांगोळी स्पर्धेत संदीप कांबळे, वर्षा बागुल, साक्षी कांबळे, वेदांगी मुकादम, अश्विनी बनप, उत्तेजनार्थ- सुशांत सनगरे, एकता गाठे, कीर्ती भिडे, नीलेश गावडे यांनी यश मिळवले. या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. Sharadotsav at Aagashe Vidyamandir

या कार्यक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखाध्यक्ष सौ. तेजा मुळ्ये, सामाजिक कार्यकर्ते भूषण बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून आणि शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, श्रीकृष्ण दळी, दादा कदम, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम उपस्थित होते. तसेच ५० पालक बंधू भगिनी सहभागी झाल्या होत्या. मंजिरी गुणे यांनी सूत्रसंचालन केले. वैदेही भिंगारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्था समिती, प्रतिनिधी मंडळाचे सहकार्य लाभले. Sharadotsav at Aagashe Vidyamandir

नाट्यछटा स्पर्धेचा निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)
इयत्ता पहिली- ज्ञानेश काळे, श्रीपाद भिडे, रिया काजरेकर, उत्तेजनार्थ- सोहन वैद्य, ओवी धुळप. इयत्ता दुसरी- वर्धन बेहेरे, सोहन भागवत, स्वरा आठल्ये, उत्तेजनार्थ- श्रेया चव्हाण, युवराज कारकर. इयत्ता तिसरी- आभा घारपुरे, श्रुती आठल्ये, स्वराली टापरे, उत्तेजनार्थ- दुर्वा इंदुलकर, शुभम केळकर. इयत्ता चौथी- खुशी केळकर, धैर्या गवाणकर, सान्वी बेहेरे, उत्तेजनार्थ- दत्तात्रेय नार्वेकर, श्रीनिवास भिसे. Sharadotsav at Aagashe Vidyamandir
