गुहागर, ता. 14 : रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये दि. १२ जानेवारी २०२४ रोजी प्रथमच तृतीय वर्ष हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रकल्पांतर्गत श्याम सागरी थीम डिनर 2024 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच डिनरचा बुफे ओपन करण्यात आला. Shamsagri-themed dinner 2024 at Sringaratali
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.जास्मिन मॅडम (सनदी अधिकारी, गुहागर), मा.सौ.प्रतिभा वराळे (तहसिलदार, गुहागर), श्री मोहन संसारे (अध्यक्ष, व्यापारी संघ, श्रृंगारतळी), मा.श्री.पवन कांबळे (पोलीस उपनिरीक्षक, गुहागर) मा.श्री.मारुती होडेकर (कार्याध्यक्ष, खारवी समाज, गुहागर) मा.श्री. राजेश बेंडल ( नगराध्यक्ष,नगरपंचायत, गुहागर) तसेच रिगल एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. श्री.सुशील चव्हाण आणि मा.श्री.विराज दळी उपस्थित होते. Shamsagri-themed dinner 2024 at Sringaratali
दीप प्रज्वलन व एकविरा आईच्या आरतीने अनोख्या पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये सर्व उपस्थित पाहुण्यांचा तसेच थीम डिनर या कार्यक्रमासाठी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केलेल्या दात्यांचा मा.श्री.शिर्के सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व पोफळीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच रिगल कॉलेजमधून नोकरी मिळून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडला. स्टुडंट ऑफ द इअर म्हणून कु.आदित्य झगडे याला गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये रिगल कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व व्यावसायिक कोर्सेसची माहिती दिली तसेच रिगल कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 100% प्लेसमेंट बद्दल माहिती दिली. तसेच हा थीम डिनर चा कार्यक्रम व सर्व व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले आहे असे त्यांनी सांगितले. Shamsagri-themed dinner 2024 at Sringaratali
आपल्या मनोगतामध्ये मा. जास्मिन मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल कौतुक केले तसेच कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मा.श्री. पवन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना गुहागरला अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेले असल्यामुळे मुलांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःचा पर्यटन व्यवसाय देखील सुरू करावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा.श्री.राजेश बेंडल यांनी गुहागर मधील विद्यार्थ्यांना स्थानिक ठिकाणीच व्यवसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. श्री. शिर्के सर यांचे आभार मानले तसेच मा. श्री.मोहन संसारे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा.श्री.संजयराव शिर्के सर यांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा असून संस्थेच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. Shamsagri-themed dinner 2024 at Sringaratali
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कोळी नृत्य, फॅशन शो तसेच विविध सुमधुर गाण्यांचा समावेश होता. डिनर मध्ये व्हेज व नॉनव्हेज स्टार्टर व मेन कोर्स चा समावेश होता अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक असे या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.शाहरुख चौगुले तसेच आभार प्रदर्शन प्रा. सौ .समीरा नरवणकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी इव्हेंट इन्चार्ज म्हणून प्रा.श्री. विक्रम खैर तसेच स्टुडंट इन्चार्ज ऑफ द इव्हेंट म्हणून कु.रोशन पवार यांचे मार्गदर्शन लाभले. Shamsagri-themed dinner 2024 at Sringaratali
या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज, शृंगारतळीचे हॉटेल मॅनेजमेंटचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजयराव शिर्के संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Shamsagri-themed dinner 2024 at Sringaratali