• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

by Ganesh Dhanawade
June 30, 2023
in Guhagar
95 1
1
Shahu Maharaj Jayanti Speech Competition
187
SHARES
535
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांचे आयोजन

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (Junior College Patpanhale) या विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. सामाजिक न्याय दिन कार्यक्रमानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. Shahu Maharaj Jayanti Speech Competition

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस.टी. गावडे, माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस. एस. चव्हाण, शिक्षक श्री. एस.एम. आंबेकर उपस्थित होते. सामाजिक न्याय दिन कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील कु. मृण्मयी जाधव, मानसी पालकर, समृध्दी आंबेकर, देव्याणी घरट, श्रेया अवेरे या विद्यार्थिंनिंनी राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन परिचय, शैक्षणिक व सामाजिक कार्य या विषयांबाबत वकृत्व सादर केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस. चव्हाण यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन परिचय, शाहू महाराजांनी केलेली शैक्षणिक व सामाजिक कार्ये आदी विषय मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. Shahu Maharaj Jayanti Speech Competition

मुख्याध्यापक श्री. थरकार यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी असलेले योगदान, राजर्षी संपादन केलेली पदवी, शाहू महाराजांचे कोल्हापूर संस्थानमधील असलेले कार्य आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण यांनी केले. तर शिक्षक श्री. एस.एम.आंबेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Shahu Maharaj Jayanti Speech Competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJunior College PatpanhaleLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShahu Maharaj Jayanti Speech CompetitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यापाटपन्हाळे महाविद्यालयमराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.