निकृष्ट बांधकामाचा परिणाम, मनसेचे प्रसाद कुष्टे यांचा आक्रमक पवित्रा
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीट गटारे बांधण्यात आली. मात्र, त्यांची कामे अर्धवट व निकृष्ट झाल्याने या गटारात मोकाट जनावरे पडून ती जखमी होत आहेत. याविरोधात गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे यांनी संताप व्यक्त करुन निकृष्ट बांधकामाविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला आहे. Sewers are deadly for stray cattle


गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी जानवळे फाटा ते मच्छी मार्केटपर्यंत रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीटची गटारे बांधण्यात आली. काही गटारांची कामे अर्धवट ठेवण्यात आली तर काही जी पूर्ण झाली त्यांची बांधकामे निकृष्ट झाली आहेत. काँक्रीट पडून लोखंडी सळ्या बाहेर येणे, मध्येच काँक्रीटला तडे जाणे व बांधकाम ढासळणे असे प्रकार सुरु आहेत. मध्यंतरी गटारात माणसेही पडण्याचे प्रकारही घडलेले आहेत. Sewers are deadly for stray cattle


शनिवारी हाँटेल कोकणरत्न समोर काँक्रीट गटारात एक वासरु पडून अडकले आणि जखमी झाले. अशावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबू तेलगडे व काही नागरिकांनी या वासराला बाहेर काढले. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे येथील काँक्रीट गटारे जीवघेणी ठरली असून अर्धवट गटारांची कामे पूर्ण करुन जी तुटलेली आहेत त्यांचीही दुरुस्ती व्हावी, अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा प्रसाद कुष्टे यांनी दिला आहे. Sewers are deadly for stray cattle