ग्रामस्थांच्या श्रमदानात शाळेतील विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा
गुहागर, ता. 21 : सद्याच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्र्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सन २०२६-२७ च्या मिशन बंधारे अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या श्रमदानातून ग्रामपंचायत उमराठने नुकतेच सात वनराई बंधारे बांधले आहेत. यामध्ये गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता तर शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलायला आहे. Seven forest dams built in Umrath

गावातील उमराठ व उमराठ खुर्द आंबेकरवाडी या दोन्ही महसूल गावांतील मध्यवर्ती असलेल्या बौद्धवाडी व जालगावकरवाडी जवळच्या टाळई नदीवर एक वनराई बंधारा आंबेकरवाडी, बौद्धवाडी व जालगावकरवाडी ग्रामस्थांनी बांधला आहे. घाडेवाडी नदीवर तीन वनराई बंधारे घाडेवाडी व गोरिवलेवाडी ग्रामस्थांनी, कोंडवीवाडी ग्रामस्थांनी गोठणीवर एक बंधारा, डागवाडी व धारवाडी ग्रामस्थांनी केतकवणे येथील नदीवर एक वनराई बंधारा तर मराठवाडीतील मंडळींनी मराठवाडी नदीवर वनराई बंधारा बांधला आहे. असे एकूण सात वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. Seven forest dams built in Umrath

सदर वनराई बंधारे बांधताना गुहागर तालुक्यातील निवडणूक नायब तहसीलदार मेहता मॅडम, महसूल विभागाचे मंडल अधिकारी ठसाळे भाऊ, ग्राम महसुल अधिकारी सुशील परिहार, परदेशी, सोनार व महसुल सेवक (कोतवाल) जान्हवी कांबळे मॅडम, सर्व हेदवी मंडल कर्मचारी तसेच गुहागर पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, उमराठचे ग्रामपंचायत प्रशासक पौर्णिमा सोनावणे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे, माजी सरपंच जनार्दन आंबेकर, शशिकांत दाभोळकर, सुनील वाघे, नाम फाऊंडेशनचे गुहागर तालुक्यातील संपर्क प्रमुख प्रथमेश पोमेंडीकर, पोलीस पाटील वासंती आंबेकर, मोहन आंबेकर, रूपा आंबेकर, गंगाराम आंबेकर, सौ. प्रविणा आंबेकर, रामचंद्र आंबेकर, वसंत गावणंग, मुकुंद आंबेकर, विनायक कदम, ऋती कदम, अशोक जालगांवकर, बौद्धवाडी व जालगावकर वाडीतील मंडळी तसेच शांताराम गोरिवले, महेश गोरिवले, माजी उपसरपंच सुरज घाडे, संदीप गावणंग व घाडेवाडी, गोरिवलेवाडीतील ग्रामस्थ मंडळी सहभागी झाले होते. Seven forest dams built in Umrath

यावेळी नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी प्रथमेश पोमेंडीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नदी गाळमुक्त करण्यासाठी तसेच पाणी कशा पद्धतीने वापरावे व पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे भाऊ यांनी सर्व श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांचे, प्रामुख्याने महिला वर्गाचे, र्विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उपस्थितांचे आभार मानले. सदर मिशन बंधारे अभियानांतर्गत वनराई बंधारे योजना राबविण्यात व यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व साईस दवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. Seven forest dams built in Umrath

