महीना 100 युनिट पर्यंत ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सुरज मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना
गुहागर, ता. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास 25 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरण कडून विशेष सेवा कक्ष उभारण्यात आला असून 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत ” सेवा सेतू ” आणि “सेवा संकल्प” अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागर मध्ये गुहागर आगार येथे आजपासून महावितरणने या संकल्प अभियानाला उत्साहात प्रारंभ केला आहे. या अभियानामुळे महिना 100 युनिट पर्यंत ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्या घर मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना अधिक लाभदायक ठरणार आहे. “Seva Setu” and “Seva Sankalp” campaign
या अभियानाला गुहागरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण, उपकार्यकारी अभियंता सुनील सूद, तळवळीचे कनिष्ठ अभियंता ऑल्विन फर्नांडिस, गुहागरचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश शेट्ये, शृंगारतळीचे सहाय्यक अभियंता बापू सोनवणे, गुहागरच्या सहाय्यक अभियंता सौ.काजल नायक, गुहागरचे आगर प्रमुख स्वप्निल शिंदे, विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे, सावर्डेचे(सोलर) इंडोवेट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे मंदार शेंबेकर, आबलोलीचे कनिष्ठ अभियंता सुजय निकम, गुहागरचे उच्चस्तरीय लिपिक महेश डिंगणकर आदि. मान्यवरांच्या उपस्थितीत ” सेवा सेतू “आणि “सेवा संकल्प” अभियानाला प्रारंभ करण्यात आला. “Seva Setu” and “Seva Sankalp” campaign
यावेळी विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे यांनी मौलिक मार्गदर्शन करताना या अभियानाचा गुहागर तालुक्यातील 122 गावांना लाभ होईल. या अभियानाला आमचा कायम पाठिंबा राहील असे सांगून सर्वांचे आभार मानले. “Seva Setu” and “Seva Sankalp” campaign
