• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सेवा संकल्प अभियाना’मुळे चिमुरडीला मिळाले नवे हास्य

by Mayuresh Patnakar
September 24, 2026
in Ratnagiri
93 1
2
Seva Sankalp Abhiyan
182
SHARES
520
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

रत्नागिरी, ता. 24 : शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील तीन वर्षांची चिमुरडी कु. हर्षाली सीताराम मोरे हिला नवीन हास्य मिळाले आहे. तपासणीदरम्यान तिच्यामध्ये ‘दुभंगलेले ओठ आणि टाळू’ (क्लेफ्ट लिप व पॅलेट) हा जन्मजात दोष आढळून आला होता. त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) समन्वयातून डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटलच्या योजनेअंतर्गत तिच्यावर यशस्वी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. Seva Sankalp Abhiyan

 शस्त्रक्रियेनंतर या लहानग्या लाभार्थीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन मयेकर, डॉ. गायत्री फडके, श्री. तायडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. हल्ये मॅडम, आरबीएसके पथक तसेच स्थानिक अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. Seva Sankalp Abhiyan

अधिकाऱ्यांनी हर्षालीच्या आरोग्याची सविस्तर पाहणी करून तिच्या पुढील देखभालीबाबत पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले. वेळेवर झालेली तपासणी आणि तत्पर वैद्यकीय उपचारांमुळे चिमुकल्या हर्षालीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलल्याने तिच्या कुटुंबीयांनी आरोग्य विभाग व शासनाच्या या अभियानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. Seva Sankalp Abhiyan

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSeva Sankalp Abhiyanटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.