सलग एक तास तिरंग्यासह स्केटिंग करून केला रेकॉर्ड
गुहागर, ता. 04 : विहान स्पोर्ट क्लब चिपळूणच्या कु. हर्ष पेढांबकर याने आपल्या साथीदारांसह सलग एक तास तिरंग्यासह स्केटिंग करून इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. Set a world record by skating with the Tiranga

देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा केला गेला. याच धर्तीवर स्वातंत्र्यदिनी इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड व ग्लोबल जीनियस रेकॉर्डसाठी स्केटिंगचा उपक्रम पार पडला. चिपळूण येथील विहान स्पोर्ट क्लब व लांजा येथील 12 खेळाडूंनी सलग एक तास तिरंगा ध्वज हाती घेऊन स्केटिंगच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. विविध जिल्ह्यातील दोनशे खेळाडू यात सहभागी झाले होते. चिपळूण तालुक्यातील कोंढे येथील रिगल कॉलेजच्या इनडोअर ग्राउंडमध्ये हा रेकॉर्ड घेण्यात आला. प्रमुख अतिथी रिगल एजुकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. संजय शिर्के यांनी राष्ट्रध्वज दाखवून रेकॉर्डला सुरुवात केली. Set a world record by skating with the Tiranga

कु. हर्ष यशवंत पेढांबकर हा पाग हायस्कूल चिपळूण येथे इयत्ता 8 वीत शिकत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून हर्ष स्केटिंगचे धडे गिरवत आहे. जिल्हास्तरावर त्याने रोड रोलिंग स्पर्धांमध्ये विविध मेडल मिळवलेले आहेत. सध्याच्या विश्वविक्रमामध्ये वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया व ग्लोबल जिनियस रेकॉर्ड या संस्थांनी याची नोंद घेऊन पदक व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. Set a world record by skating with the Tiranga

