मुंबई, ता. 04 : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद शरद पवारांनी भूषविले आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने आता ते तिसर्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पहिल्यांदा २०१४ ते २०१९ या काळात पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले होते. २०१९ मध्ये गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस यांनी अवघ्या साडे तीन दिवसानंरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तिसर्या खेपेला त्यांचा गुरुवारी शपथविधी पार पडत आहे. राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोनच मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण केला. उर्वरित १८ जणांना पाच वर्षांचा सलग कालावधी मिळालेला नाही. Served as chief minister more times
वसंतराव नाईक यांनी १९६३ ते १९७५ असे सर्वाधिक ११ वर्षांपेक्षा अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविले. शरद पवार यांनी सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी त्यांचा पूर्ण कालावधी हा साडेपाच वर्षांचा आहे. सर्वात कमी साडे तीन दिवस मुख्यमंत्रीपद हे फडणवीस यांनी भूषविले आहे. एकापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे नेते : शरद पवार (४ वेळा़), वसंतराव नाईक (३ वेळा), वसंतदादा पाटील (३ वेळा), शंकरराव चव्हाण (२ वेळा), अशोक चव्हाण (२ वेळा), विलासराव देशमुख (२ वेळा), देवेंद्र फडणवीस (आता तिसर्यांदा),
एक वेळेला मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते :
यशवंतराव चव्हाण, वामनराव कन्नमवार, पी. के. सावंत, बॅ. ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर पाटील, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे. Served as chief minister more times
उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांना कधीच आतापर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली नव्हती. ही प्रथा फडणवीस यांनी मोडीत काढली आहे. मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपद भूषविणारे फडणवीस हे जसे पहिलेच तसेच उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळणारे पहिलेच ठरले आहेत. आतापर्यंत नासिकराव तिरपुडे, सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. यापैकी फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. Served as chief minister more times