• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा

by Mayuresh Patnakar
July 1, 2026
in Guhagar
71 1
0
Senior citizen's birthday in Umrath
140
SHARES
401
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : रत्नागिरी पोलीस दलाच्या “मिशन जीवन” उपक्रमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनच्या वतीने उमराठ येथील जून महिन्यात वाढदिवस असलेल्या १७ ज्येष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मंगळवारी ग्रामपंचायत उमराठ कार्यालयात उत्साहात पार पडला. Senior citizen’s birthday in Umrath

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून “मिशन प्रतिसाद” हा उपक्रमही सुरू असून त्याचा हेल्पलाईन क्रमांकही प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आला आहे.

Senior citizen's birthday in Umrath

यावेळी राजश्री गावणंग, भागोजी गावणंग, शांताराम गोरिवले, गंगाराम गोरिवले, काशिराम गावणंग, रुक्मिणी गोरिवले, विनायक कदम, देवजी गावणंग, भागीरथी गावणंग, शुभद्रा धनावडे, प्रकाश पवार, देवजी गोरिवले, पांडुरंग गावणंग, गंगाय गावणंग, भिकू मालप, प्रभावती गावणंग आणि महादेव गावणंग अशा एकूण १७ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास गुहागर पोलीस स्टेशनतर्फे हेदवीचे पोलीस पाटील रवींद्र मोहित, ग्रामपंचायत उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर, गुहागर पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य केले. Senior citizen’s birthday in Umrath

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSenior citizen's birthday in Umrathटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.