गुहागर ता. 30 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय येथे प्रकृती फाऊंडेशन तर्फे आज दुपारी 3 ते 5 यावेळेत ‘मासिक पाळी आणि sanitary pads व्यवस्थापन’ या विषयी परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या परिसंवादात सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त भगिनींनी उपस्थित राहावे. अशी ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे विनंती करण्यात आली आहे. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

सर्व भगिनिंमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे एक पाऊल पुढे टाकले जात आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गुहागर तहसिलदार मा. प्रतिभा वराळे मॅडम उपस्थित राहणार आहेत. तसेच वक्ते – डॉ. सुनेत्रा खातू, सामाजिक कार्यकर्त्या, पारिजात कांबळे, माजी नगराध्यक्ष, स्नेहा वरंडे, प्रकृती फाऊंडेशनच्या मिलन जंगम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र आरेकर यांचे लाभले आहे. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library

तरी सर्व भगिनींनी आज ‘मासिक पाळी आणि sanitary pads व्यवस्थापन’ या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. Seminar on Women’s Issues at Jnanarashmi Library
