• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सीए इन्स्टिट्यूटच्या वतीने चिपळूणमध्ये चर्चासत्र

by Guhagar News
February 28, 2024
in Old News
185 1
1
Seminar in Chiplun organized by CA Institute
363
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 28 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या  रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळाला. हे चर्चासत्र खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रँड येथे झाले. या चर्चासत्राला रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली येथील ३० चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. Seminar in Chiplun organized by CA Institute

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेने वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच गेल्या वर्षभरात विविध करविषयक आणि व्यावसायिक नीतिमत्ता विषयांवर केलेली विविध चर्चासत्रे, बैठका व निवासी सेमिनार यांच्यासंदर्भात देखील माहिती दिली. चर्चासत्र दोन टप्प्यात पार पडले. सकाळच्या सत्रामध्ये सीए. अनुप शहा यांनी नव्याने पारित झालेला मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा आणि सीए म्हणून काम करताना असलेल्या जबाबदाऱ्या विशद केल्या. त्यानंतर लेखापरीक्षण करताना आवश्यक असणारी प्रमाणे अर्थात ऑडिटिंग स्टँडर्ड्स याविषयी विस्तृत चर्चा केली. Seminar in Chiplun organized by CA Institute

Seminar in Chiplun organized by CA Institute

दुपारच्या सत्रामध्ये पुणे येथील सीए रोहित शहा यांनी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावरील प्रभाव स्लाईड शो सह दाखवला. आज आधुनिक तंत्रज्ञानाने काही सेकंदात आपल्याला हवी ती माहिती मिळत असली तरी ती इंटरनेट रोबोटद्वारे मिळत असल्याने तिची सत्यता पडताळणे जरुरी आहे. मानवाला जशा भावना किंवा तर्कशास्त्र आहे तसे या आर्टीफिशियल तंत्रज्ञानाला नाही. त्यामुळे मानवी ज्ञानाला भविष्यात पर्याय असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. Seminar in Chiplun organized by CA Institute

शेवटच्या सत्रात अनुप शहा यांनी इन्कमटॅक्स मधील व्यापाऱ्यांना महत्वाच्या असणाऱ्या खर्च आणि देणी विषयक तरतुदींवर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसंदर्भांत आपल्या शंका उपस्थित करून त्यावर कायदेशीर सल्लामसलत केली. अशा चर्चा सत्रांमुळे दर वेळी नवनवीन येणाऱ्या कायदे व नियमांबाबत माहिती मिळत असल्याने सीए इन्स्टिटयूट सतत या प्रकारचे सेमिनार व बैठका आयोजित करत असते. Seminar in Chiplun organized by CA Institute

सूत्रसंचालन सीए स्वाती ढोल्ये यांनी केले. सीए शशिकांत काळे, सीए गुरुनाथ भिडे आणि सीए श्रेयस काकिर्डे यांनी आपपल्या व्यवसायातील अनुभव विशद केले; आणि सीए व्यवसायात येणारी नवनवीन आव्हाने मांडली. सीए अमित ओक आणि सीए सुमेध करमरकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. Seminar in Chiplun organized by CA Institute

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSeminar in Chiplun organized by CA InstituteUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share145SendTweet91
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.