रत्नागिरी, ता. 07 : भारत शिक्षण मंडळाचे देव- घैसास – कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास या विषयावर एक दिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आले होते. Seminar at Dev, Ghaisas Kir College
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सौरभ देवळे (डिलाईट इंडस्ट्री, रत्नागिरी), निलीन करंजवकर (काळीमिरी उत्पादक, नाटे), वैभव माने (लेखापाल, खादी ग्रामोद्योग महामंडळ, रत्नागिरी) धीरज मोरे (रिटेल सेंटर, नाचणे रोड, रत्नागिरी) उपस्थित होते. त्यांनी यशस्वी उद्योजक कसे व्हायचे, त्यांच्यासाठी कोणत्या योजना आहेत, बँका काय सुविधा पुरवतात या संदर्भात मार्गदर्शन केले. Seminar at Dev, Ghaisas Kir College
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मधुरा पाटील व उपप्राचार्य वसुंधरा जाधव तसेच वाणिज्य शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी करमरकर यांनी केले. Seminar at Dev, Ghaisas Kir College