रत्नागिरी, ता. 12 : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयात सुरू आहे. याशिबिरात 11वी आणि 12वी मधील 63 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. ‘ग्राम विकासातून व्यक्तिमत्व विकास’ या संकल्पनेला अनुसरून विविध उपक्रमांचे आयोजन शिबिरात केले आहे. यापैकी स्व-संरक्षण विषयावर मार्गदर्शन आणि कराटे प्रात्यक्षिक घेण्यासाठी रत्नागिरी मध्ये गेली 27 वर्ष मार्शल आर्ट च ट्रेनिंग देणारे व स्वयंसिद्धा शासकीय प्रशिक्षक श्री. राम कररा, त्यांचे सहकारी व विद्यार्थी यांचे शिबिरात मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. Self defense is the need of the hour
‘कोणाला इजा करण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी’ आपण या कौशल्याचा वापर करणार असल्याचे श्री.कररा यांनी स्वयंसेवकांना सांगितले. आपणावर हल्ला झाल्यास अनपेक्षित प्रतिहल्ला केल्यास हल्लेखोर बावचळतो व आपण त्याच्यावर वरचढ होऊ शकतो. स्व संरक्षणाचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी सततचा सराव व निरोगी शरीराची आवश्यकता असते. त्याच बरोबर आत्मविश्वास व धैर्य यामुळे आपणावर आलेल्या संकटातून आपण बचावू शकतो. Self defense is the need of the hour
सत्रात श्री. कररा यांनी विविध दिशांनी हल्ला झाल्यास काय कृती करावी हे समजाऊन दिले व स्वयंसेवकांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. ट्रेनिंग देण्यासाठी सहप्रशिक्षक सौ. शशिरेखा कररा, श्री. अमित जाधव, श्री. प्रतिक पवार, कु. गुरुप्रसाद सावंत, कु. सई सुवारे, कु. वेदान्त देसाई, कु. उपार्जना कररा, कु. रूही कररा उपस्थित होते. यावेळी एनएसएसचे स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी श्री. निनाद तेंडुलकर, श्री.अभिजीत भिडे, श्रीम. अन्वी कोळंबेकर, श्रीम. स्नेहा बाणे यांनी प्रशिक्षणा सहभाग घेतला. Self defense is the need of the hour