गुहागर, ता. 22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), राष्ट्रीय सेवा योजना विभाग (National Service Scheme) आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण” शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर दि. १५, १७ , आणि १८ जुलै, २०२३ या तीन दिवसांच्या कालावधीत पार पडले. या शिबिराचा लाभ ९१ मुलींनी घेतला. Self defense camp concluded in KDB College

यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री. सचिन सावंत, पोलिस निरीक्षक, गुहागर पोलिस ठाणे व त्यांचे सहकारी मा.श्री पवन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक, गुहागर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संरक्षण अधिकारी श्रीमती माधवी जाधव यांनी महिला व मुलींवरील होणारे अत्याचार आणि त्यांवरील उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय स्त्री शक्तीच्या गुहागर प्रतिनिधी प्रज्ञा धामणस्कर यांनी स्त्रियांच्या क्षमतेची जाणीव करून दिली. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गुहागर यांच्या पर्यवेक्षिका श्रीमती अंकिता महाडिक यांनी विद्यार्थिनींना आणि महिला कर्मचारी यांच्यामध्ये सामाजिक व कायदेशीर जागरुकता करून त्यांचे महत्व स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. पद्मनाभ सरपोतदार यांनी आपल्या अनुभवातून समाजामध्ये स्त्री व पुरुष यांच्या समानतेबद्दल मार्गदर्शन केले. Self defense camp concluded in KDB College

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा.शीतल मालवणकर यांनी केले. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण कु. हुजैफा ठाकूर व त्यांचे सहकारी यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.समरीन बोट हिने केले. आभार प्रदर्शन प्रा.संतोष जाधव यांनी केले. Self defense camp concluded in KDB College
यावेळी कार्यक्रमास श्रीमती पूनम प्रभारले, श्रीमती चैताली हळये-पर्यवेक्षिका गुहागर, श्रीमती पूजा गायकवाड-गुहागर पोलिस ठाणे व त्यांचे सहकारी श्रीमती प्राजक्ता कांबळे, तसेच महाविद्यालयातील प्रा.डॉ.आनंद कांबळे आणि प्रा.निळकंठ भालेराव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Self defense camp concluded in KDB College
