वेळंब शाळा नं 1 शाळेतील विद्यार्थीनी ; केंद्र, बिट व तालुका स्तरावर यश
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील वेळंब शाळा नं 1 शाळेतील क्षितिजा मोरे व प्रिया जाधव या दोन विद्यार्थीनीची इस्रो नासा परीक्षेसाठी जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तालुका स्तरावर झालेल्या इस्रो नासा निवड चाचणी परीक्षेत क्षितिजा शशिकांत मोरे हिने 69 गुण मिळवत तिसरा तर प्रिया मनीष जाधव हिने 60 गुण मिळवत पहिल्या 10 मध्ये 9 वा नंबर पटकावला आहे. Selection of Students for ISRO NASA Exam


केंद्र, बिट स्तरावर व तालुका स्तरावर यश संपादन करून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. ग्रामीण भागात असूनही मोठे यश मिळवल्याने शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, बिट विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
त्यांना वेळंब नं 1 शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव, वर्गशिक्षिका श्रीम. सविता देशमुख, उपशिक्षक संजय पावसकर, उपशिक्षक हृषीकेश श्रीकृष्ण मगर, पदवीधर शिक्षक श्रीकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. Selection of Students for ISRO NASA Exam