अरुअप्पा स्पर्धा परीक्षा अकादमीची विद्यार्थिनी
रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या शांभवी पाटील हिची महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातील स्टेनोग्राफर या पदी निवड झाली आहे. शांभवी पाटील हिने २०० पैकी १६२ गुण मिळवत हे यश संपादन केले आहे. ही परीक्षा आयबीपीएसमार्फत घेण्यात आली. Selection of Shambhavi Patil as Stenographer
शांभवी पाटील हिने अकादमीमध्ये तलाठी भरतीचा कोर्स केला होता. त्यानंतर तिने अभ्यासिकेत येऊन स्वतःचा अभ्यास करण्यास सुरवात केली. गेली सहा महिने ती विविध परीक्षांचा अभ्यास करत आहे. निरनिराळ्या परीक्षांमध्ये समाधानकारक गुण न मिळाल्याने तिने अभ्यासाचा सपाटा चालू केला होता. अकादमीतील अभ्यासिकेत दररोज १० ते १२ तास अभ्यास करून त्यामध्ये सातत्य ठेवत हे यश तिने संपादन केले. अकादमीच्या मार्गदर्शकांकडून नेहमीच परीक्षांसाठी उपयुक्त माहिती मिळत गेल्याने शाभंवीने सांगितले. Selection of Shambhavi Patil as Stenographer

या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे व अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी या शांभवीचे कौतुक केले. अकादमीतर्फे जिल्हा न्यायालय फास्टट्रॅक बॅच सुरू होणार आहे. अकादमीची अभ्यासिका सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू असते. अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी अभ्यासिकेत येतात. रत्नागिरीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून अकादमीचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे. Selection of Shambhavi Patil as Stenographer
