सरचिटणीसपदी सुनिल गमरे ; बिनविरोध निवड
गुहागर, ता. 06 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर अध्यक्षपदी संदीप कदम तर सरचिटणीसपदी सुनिल गमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही तालुका कार्यकारणी निवड बैठक वरवेली येथे झाली. रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांचे प्रमुख उपस्थितीत व जिल्हा कार्यकारणी सदस्य विजूआप्पा कदम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात बैठक घेण्यात आली. Selection of Republican Party positions

यावेळी तालुका प्रवक्ता – शशिकांत जाधव (वरवेली), उपाध्यक्षपदी सुरेश जाधव (वेळंब), विलास गमरे (परचुरी), चिटणीसपदी दशरथ पवार (असगोली), चंद्रकांत मोहिते (पवारसाखरी), कोषाध्यक्षपदी दिपक गमरे (पालपेणे), संघटकपदी महेंद्रआप्पा कदम (आबलोली), शंकरराव मोहिते (कोतळुक), कार्यकारणी सदस्यपदी दत्ताराम कदम (आबलोली), गुहागर तालुका युवक अध्यक्षपदी विजय असगोलकर (असगोली), युवक उपाध्यक्षपदी वैभव जाधव (अडूर), युवक जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर मोहिते (पालशेत), बेसिक जिल्हा प्रतिनिधी अनंत पवार (शीर), विद्याधर (विजूआप्पा) कदम (आबलोली), मारुती मोहिते (पवारसाखरी) आदींचा कार्यकारिणीत समावेश आहे. उर्वरित कार्यकारिणी विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. Selection of Republican Party positions

