खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय यांची आयआयटी, मुंबई यांच्याकडून निवड
गुहागर, ता. 26 : उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष, आयआयटी मुंबई आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २० गावांच्या पाणीपुरवठा सद्यस्थितीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून अभ्यास केला जात आहे. या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठ अंतर्गत १४ महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय यांची आयआयटी, मुंबई यांच्याकडून निवड करण्यात आली आहे. Selection of KDB College by IIT, Mumbai
या अभ्यासासाठी खरे-ढेरे- भोसले महाविद्यालयातील ४ विद्यार्थी आणि १ मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून निवड केली गेली. सदर टीमने गुहागर तालुक्यातील त्रिशूल-साखरी आणि दापोली तालुक्यातील करंजगाव या गावातील प्रत्येक वाडीत जावून पाणी पुरवठा व्यवस्था आणि भूजल साठ्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून सदर अहवाल आयआयटी, मुंबई मार्फत रत्नागिरी जिल्हा परिषद यांचे कडे भविष्यातील पाणी पुरवठा व्यवस्थापनाबाबत सूचना आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून सादर केला. तो पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद यांनी मान्य केलेला आहे. Selection of KDB College by IIT, Mumbai
सदर प्रकल्पासाठी जिल्हा परिषद, रत्नागिरी आणि आय आय टी, मुंबई मार्फत महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना प्रकल्प कामासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा मिळाले आहे. याद्वारे महाविद्यालायीन विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प कसा करावा याचा अनुभव मिळाला असून त्याचा भविष्यात या विद्यार्थ्यांना देखील निश्चितच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन मार्गदर्शक डॉ. ऋषिकेश गोळेकर यांनी केले. Selection of KDB College by IIT, Mumbai
महाविद्यालयातील शास्त्र विभागाचे विद्यार्थी संजना निवाते, सोहम डाकवे, मकरंद गाडगीळ आणि शुभम कुरधुंडकर या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण केले. या विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबई कडून उन्हाळी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही दिले गेले आहे. सदर जल जीवन मिशन प्रकल्पाचे काम केल्याबद्दल गुहागर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री. महेश भोसले आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. पद्मनाभ सरपोतदार यांनी संबंधित विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे अभिनंदन केले व असेच प्रकल्प भविष्यात देखील विद्यार्थ्यांनी करावेत यासाठी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. Selection of KDB College by IIT, Mumbai