केतन अंभिरे, किनारपट्टी सुरक्षा व प्रदुषणाचा अभ्यास करणार
मुंबई, ता. 08 : देशाच्या सागरी सीमांवरील गावात सुरक्षेविषयक जागरण करण्यासाठी सागरी सीमा मंचने 9 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत सागरी परिक्रमेचे आयोजन केले आहे. मुंबईतील वेसावे मधून या परिक्रमेला सुरवात होणार असून धाकटी डहाणू येथे परिक्रमेचा समारोप होणार आहे. या परिक्रमेमध्ये आरमारनिर्मिती मागील छत्रपतींची भूमिका व आजही स्थिती जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. असे सीमा जागरण मंचचे प्रांत संयोजक केतन अंभिरे यांनी पत्रकारांना सांगितले. Security awareness through maritime circulation
गेल्यावर्षी 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सीमा जागरण मंचने वरळी (मुंबई) ते विजयदूर्ग (सिंधूदुर्ग) अशी 8 दिवसांची सागरी परिक्रमा आयोजित केली होती. याच धर्तीवर यावर्षी पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबईतील वर्सोवा ते पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणुपर्यंत सागरी परिक्रमेचे आयोजन सीमा जागरण मंचाने केले आहे. या परिक्रमेदऱम्यान मढ किल्ला, अंबुवा बेट, किल्ले जंजिरा (धारावी), वसई किल्ला, रानगांव बेट, अर्नाळा किल्ला, केळवा बुरुज, शिरगांव, माहीम किल्ला, शंखोदर व डहाणू किल्ला या स्थांनाना भेट देण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या आरमारामध्ये या स्थानांचे महत्त्व काय होते याची माहिती शिवशंभो विचार मंचच्या इतिहास अभ्यासकांकडून घेतली जाणार आहे. Security awareness through maritime circulation
या परिक्रमेचे उद्घाटन समारंभ 9 जानेवारीला वर्सोवा, मुंबई येथील सर्वोदय सोसायटीच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह व शिवशंभो विचार मंच महाराष्ट्रचे संयोजक सुधीर थोरात, वर्सोवा कोळीवाडा इतिहास या पुस्तकाचे लेखक भगवान भानजी व बिपीन कुमार हे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. Security awareness through maritime circulation
परिक्रमेदरम्यान 10 जानेवारी रोजी अर्नाळा, 11 जानेवारी रोजी सातपाटी व 12 जानेवारी रोजी धाकटी डहाणू येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन ग्रामस्थांना विनामुल्य पहात येणार आहे. सभेच्या माध्यमातून वर्तमान स्थितीत सागरी सीमांच्या सुरक्षेची गरज या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सागरी परिक्रमा म्हणजे पर्यटन सहल नसून शिवरांच्या आरमाराचे महत्त्व, आजही असलेली सागरी सीमांच्या सुरक्षेची गरज, किनारपट्टवरील प्रदुषणाची व्याप्ती, सुरक्षाविषयक सध्या असलेल्या व्यवस्थांची स्थिती याचा अभ्यास केला जाणार आहे. अशी माहिती अंभिरे यांनी दिली आहे. Security awareness through maritime circulation