“शेवटची लाओग्राफिया” या कादंबरीस दुसरा पुरस्कार प्राप्त
गुहागर, ता. 17 : येथील खरे -ढेरे- भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या “शेवटची लाओग्राफिया” या कादंबरीस नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने मानाचा “केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर” करण्यात आला आहे. हा अभिवादन सोहळा दि. २९ जानेवारी रोजी मालगुंड केशवसुत स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. Second award for Labade’s novel

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी कविवर्य केशवसुत स्मारक समिती यांच्या वतीने कविता अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अथर्वप्रकाशन जळगाव यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. बाळासाहेब लबडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. Second award for Labade’s novel
मराठी कादंबरीला नवा आयाम प्राप्त करून देणारी कादंबरी म्हणजे “शेवटची लाओग्राफिया” ही कादंबरी असे ज्येष्ठ समीक्षक मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री नामदेव कांबळे, डाँ संजय नगरकर, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, श्री. भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबाराव मुसळे, श्री. चंद्रकांत पालवे, प्राचार्य साईनाथ पाचारणे, धनाजी घोरपडे, वगैरे अनेक मान्यवर समीक्षकांनी शिक्कामोर्तब केलेली ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी नवकादंबरी आहे. या कादंबरीस प्राप्त झालेला हा दुसरा पुरस्कार आहे. Second award for Labade’s novel
