किनाऱ्यावरील 18 घरांसह लगतच्या बागायतीमध्ये पाणी शिरल्याची घटना
गुहागर, ता. 15 : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमार समाजाच्या लोकवस्ती मध्ये शुक्रवारी सकाळी समुद्राच्या उधानाचे पाणी घुसले. लोकवस्तीत समुद्राचे पाणी घुसल्याने एकाच खळबळ उडाली. किनाऱ्यावरील 18 घरांमध्ये पाणी शिरले. तर लगतच्या बागायतीमध्ये पाणी घुसल्याने बागांची धूप झाली. या घटनेत किरकोळ नुकसानी झाली आहे. दरम्यान, गुहागर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील घटना कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन येथील मच्छिमारांची विचारपूस केली. तसेच येथील मच्छिमाराना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. Sea water in Velneshwar population
तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी दरवर्षी समुद्रच्या उधनाच्या पाण्यामुळे घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार होत असल्याने येथील लोकवस्ती साठी आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकूर, माजी सरपंच नवनीत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने सुमारे दोन कोटी 20 लाख रुपयांचा सुमारे 320 मीटर लांबीचा संरक्षक बंधारा मंजूर झाला आहे. याचे भूमिपूजन माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या बंधाऱ्याचे काम मार्गी लागल्यास या उधनाच्या पाण्यापासून लोकवस्तीचे संरक्षण होणार आहे. Sea water in Velneshwar population
तालुक्यात गेले दोन आठवडे कोसळत असलेला पाऊस आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता समुद्राच्या भरतीचे पाणी जोरदार किनाऱ्यावरील लोकवस्ती मध्ये घुसल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. काही क्षणातच किनाऱ्यावरील श्री. प्रथमेश शंकर धोपावकर, श्री. दैवत महादेव मोरे, श्री. काशिनाथ धोंडू पावसकर, श्री. विनोद वाषा पावसकर, श्री. दिनेश महादेव पावसकर, श्री. विश्वनाथ भिकाजीं पावसकर, श्री. सुरेश सूडक्या मोरे, श्री. चैतन्य सुधाकर धोपावकर, श्री. समीर गजानन धोपावकर, श्री. समीर शंकर पावसकर, श्री. किरण मधुकर कटनाक, श्री. नंदकुमार बाबाजी तांडेल, श्री. गगणेश संतोष पावसकर, श्री. संदीप भिकाजीं पावसकर, श्री. सोमा नारायण तांडेल, श्री. भिकाजीं केशव मोरे, श्री. लतिश विठोबा मोरे, श्री. मिलिंद गोपाळ मोरे या 18 मच्छिमार बांधवांच्या घरात उधानाचे पाणी शिरले. यामुळे घरातील किरकोळ साहित्य भिजून नुकसान झाले. तसेच काहींनी घराच्या संरक्षणासाठी स्वखर्चाने बांधलेले बांध कोसलल्याने नुकसान झाले. दुपारी 2.30 वाजता समुद्राच्या ओहटीला सुरुवात झाल्याने जास्त नुकसानी झाली नाही. लगतच्या नारळ पोफळीच्या बागायतींची पाण्यामुळे धूप झाली. Sea water in Velneshwar population
दरम्यान, लोकवस्ती मध्ये पाणी शिरल्याची घटना समजताच मंडळ अधिकारी श्री. मोरे, तलाठी राजशिर्के,सरपंच न्या चैतन्य धोपवकर यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्येक कुटुंबाची पाहणी केली. पाणी घुसल्याने किरकोळ नुकसानी झाल्याचे त्यांनी सांगितले. Sea water in Velneshwar population