• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर किनाऱ्यावरून ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्राकडे झेपावली

by Ganesh Dhanawade
January 14, 2023
in Guhagar
69 1
0
Sea turtle hatchlings at Guhagar
136
SHARES
389
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वन विभागासह कासवमित्र, वन कर्मचारी व वन्यप्राणीमित्र यांचेही सहकार्य

गुहागर, ता.14 : गुहागर वरचापाट येथील समुद्रकिनारी वाळुमध्ये ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या समुद्री कासव मादीने पहीले घरटे तयार करण्यात आले होते. सदर घरटयामध्ये ऑलिव्ह रिडले मादींच्या कासवांची १२३ अंडी सुरक्षित करण्यात आली होती. सदर सुरक्षीत केलेल्या अंडयामधून ०६ कासवाची पिल्ले (ऑलिव्ह रिडले) सुरक्षितपणे समुद्रामध्ये दि. १३ जानेवारी पहाटेच्या ७.३०च्या सुमारास सोडण्यात आली. तसेच दि. १२ जानेवारी रोजी वेळास समुद्रीकिनाऱ्यावर सुरक्षित केलेल्या १२० अंडयामधून २६ पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली. सदर घटनेने कासवमित्र, वनकर्मचारी व वन्यप्राणीमित्र यांचे मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Sea turtle hatchlings at Guhagar

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

दि १३ नोव्हेंबर २०२२ रोजी गुहागर वरचापाट या ठिकाणी ऑलिव्ह रिडले समुद्रीकासव मादीने १२३ अंडी घातलेली आहेत. त्यामधून ६ कासवांची पिल्ले आज बाहेर पडली. यंदाच्या कासवीणीच्या हंगामास अंडयांचे संवर्धन करणाऱ्या कासव मित्रांची मार्गदर्शनपर कार्यशाळा दापोली व गुहागर येथे पार पडली. यावर्षीपासून कासवमित्र हे घरटयांच्या नोंदी एम टर्टल अॅपमध्ये नोंदवतील. यासंदर्भातील कासवमित्रांना तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले असुन, यामुळे कासवांच्या घरटयांची आणि त्यातुन बाहेर पडणाऱ्या पिल्लांच्या संख्येची अचुक नोंद होणार आहे. Sea turtle hatchlings at Guhagar

सदरच्या कासव संवर्धन मोहीमेमध्ये विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) श्री सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती राजश्री कीर परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण, श्री संतोष परिशेट्टे वनपाल गुहागर, श्री अरविंद मांडवकर वनरक्षक गुहागर, श्री अमोल लोडे, श्री. संजय भोसले, कासव मित्र तसेच ग्रामस्थ व पर्यटक यांच्या उपस्थितीखाली ६ कासव पिल्लांना सुरक्षितरित्या समुद्रीकिनारी सोडण्यात आले. Sea turtle hatchlings at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOlive RidleySea turtle hatchlings at GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.