गुहागर, ता. 16 : भारतीय नौदलाचे P8 हे लढाऊ विमान 14 मार्च 23 रोजी अमेरिकेतल्या गुआम येथे पोहोचले असून अमेरिकेच्या नौदलाने आयोजित केलेल्या ‘सराव सी ड्रॅगन 23’ मध्ये सहभागी होणार आहे. अमेरिकी नौदलाने लांब पल्ल्याच्या (लाँग रेंज) एमआर ए एस डब्ल्यू विमानांसाठी समर्पित बहुपक्षीय ए एस डब्ल्यू (ASW) सरावाची ही तिसरी आवृत्ती आहे. Sea Dragon 23 practice
15 ते 30 मार्च 23 या कालावधीत होणार्या सरावात सहभागी देश पाणबुडीविरोधी युद्धावर प्रामुख्याने भर देतील . प्रगत एएसएस डब्ल्यू (ASW) कवायतींचा समावेश करण्यासाठी अशा सरावांची गरज आणि व्यापकता गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. Sea Dragon 23 practice

सी ड्रॅगन 23 सरावामध्ये परस्पर कौशल्य सामायिक करताना, सिम्युलेटेड आणि थेट पाण्याखालील लक्ष्यांचा मागोवा घेण्यासाठी सहभागी विमानांच्या क्षमतांची चाचणी घेतली जाईल. या सरावात भारतीय नौदलाचे P8I, अमेरिकन नौदलाचे P8A, जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्सचे P1, रॉयल कॅनेडियन एअर फोर्सचे CP 140 आणि रिपब्लिक ऑफ कोरियन नेव्ही अर्थात दक्षिण कोरिया नौदलाचे (RoKN) चे P3C ही लढाऊ विमाने सहभागी होतील. Sea Dragon 23 practice
मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशामधील नौदलांचा उच्च पातळीवरील समन्वय आणि सहकार्य वाढवणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे, जे त्यांच्या सामायिक मूल्यांवर आणि खुल्या, समावेशी हिंद प्रशांत महासागर क्षेत्र बांधिलकीवर आधारित आहे. Sea Dragon 23 practice
