• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साखरीआगर फाटा येथे दुचाकीला स्कार्पिओची धडक

by Ganesh Dhanawade
February 17, 2023
in Guhagar
388 4
0
Scorpio hit the bike
762
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दोघे गंभीर जखमी; पोलीस स्थानकात अपघाताची नोंद नाही

गुहागर, ता. 17 : क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने उडवल्याची घटना गुहागर तालुक्यातील साखरीआगर फाटा येथे गुरुवारी दुपारी घडली. दरम्यान, हा स्कार्पिओ चालक अपघातानंतर तिथून पळून गेला. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी या चालकाला मार्गताम्हाणे येथे ताब्यात घेतले आहे. या अपघाताची गुहागर पोलीस ठाण्यात कोणतीच नोंद करण्यात आलेली नाही. Scorpio hit the bike

अधिक माहिती अशी की, साखरीआगर येथे सध्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक संघ त्या ठिकाणी जात आहेत. आबलोली येथील संघ देखील या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. आपल्या संघाची मॅच पाहण्यासाठी लहू भालचंद्र चींगडे (वय ३७) व प्रथमेश सुरेश पागडे (वय २१) हे एकाच दुचाकीने जात होते. दरम्यान, यांची दुचाकी साखरीआगर फाटा येथे आली असता. याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने या दोघांच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि तिथून पलायन केले. त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांनी या दोघांना तात्काळ हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. Scorpio hit the bike

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

मार्गताम्हाणे येथील त्यांच्या ओळखीच्या लोकांना सदरील प्रसंग सांगून धडक देणाऱ्या गाडीचे वर्णन दिले. या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी येथीलच रुग्णवाहिकेने चिपळूण येथील विठाई हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, मार्गताम्हाणे येथील ग्रामस्थांनी स्कार्पिओ गाडीवर पाळत ठेवली होती. आणि काही वेळात सदरील गाडी येताच या गाडीला थांबवून चालकाला बाहेर काढून चांगलाच प्रसाद दिला. परंतु, या प्रकारानंतर अपघाताची गुहागर पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. Scorpio hit the bike

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarScorpio hit the bikeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share305SendTweet191
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.