• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारतात भूकंप होण्याचा शास्त्रज्ञांनी दिला इशारा

by Guhagar News
February 25, 2023
in Bharat
148 1
0
Scientists warning of earthquakes in India
291
SHARES
830
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : देशातील अनेक ठिकाणी हल्ली भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या बातम्या येत असतात. अलीकडेच तुर्की-सीरियामध्ये भूकंपाच्या धक्क्याने हजारो मृत्यू व लाखो लोक जखमी झाले आहेत. आता भारतातील शास्रज्ञांनी देखील भारतात भूकंप होण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. Scientists warning of earthquakes in India

देशातील उत्तराखंडसह हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये आणि नेपाळच्या पश्चिम भागामध्ये तीव्र भूकंप होण्याची शक्यता असल्याचा दावा नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र यांनी केला आहे. पुढील काही दिवसात कोणत्याही क्षणी हिमालयीन प्रदेशातील काही भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसणार असल्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र म्हणाले की, भारतीय हिमालयीन टेक्टॉनिक प्लेटची दरवर्षी सुमारे 5 सेंमीने हालचाल होत असते. त्यामुळे हिमालयीन पर्वतांवर जास्त ताण निर्माण होतो. आणि याठिकाणी भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण होत असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यासाठी उपाययोजना तयार ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. Scientists warning of earthquakes in India

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक प्लेट्सची हालचाल होत असल्याने सतत दाब निर्माण होत असतो. अशीच परिस्थिती पुढच्या काही दिवसात निर्माण होऊन, यामुळे भूकंप होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय टेक्टॉनिक प्लेटसची सातत्याने दरवर्षी पाच सेंमीने हालचाल होत असते, त्यामुळे हिमालयावर दबाव निर्माण होऊन भूकंप होण्याची शक्यता दाट वाढत असल्याचे म्हटले आहे. Scientists warning of earthquakes in India

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarScientists warning of earthquakes in IndiaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.