सूर्यमाला प्रथम तर वॉटर पंप विज्ञान प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक
गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय स्तरावर विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन पार पडले. यामध्ये सूर्यमाला विज्ञान प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. तर वॉटर पंप विज्ञान प्रतिकृतीने द्वितीय व थ्रीडी व्हिडिओ प्लेअर या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. Science replication exhibition at Patpanhale School

शालेयस्तरीय आयोजित केलेल्या विज्ञान प्रतिकृती दालनाचे मुख्याध्यापक एम.ए.थरकार यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते नववी या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर विज्ञान प्रतिकृती सादरीकरण प्रदर्शन आयोजित केले होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाबाबत विज्ञान शिक्षक श्री. के.डी. शिवणकर यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी मुख्याध्यापक श्री. एम.ए.थरकार, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस. एस.चव्हाण, श्री. आर. एम. तोडकरी, श्री. डी. एस. निंभोरे, श्री. एस. एम. आंबेकर आदी उपस्थित होते. Science replication exhibition at Patpanhale School
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्तच्या शालेय स्तरीय विज्ञान प्रतिकृती सादरीकरणाच्या प्रदर्शनानिमित्त एनसीआरए संस्थेतर्फे ऑनलाईन सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतीनिमित्त सहभाग प्रशस्तीपत्र संपादन केलेले विद्यार्थी कु. समृद्धी सुरेश आंबेकर, कु.भव्य भूपेंद्र पटेल, कु.यश विवेक भिडे यांचा गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक एम.ए. थरकार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विशेष प्रयत्न केलेल्या इयत्ता नववीमधील कु. मंथन सुदेश सकपाळ याचे अभिनंदन करण्यात आले. Science replication exhibition at Patpanhale School
इयत्ता पाचवी ते नववी मधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हवेपासून पवन चक्कीमध्ये वीज तयार करणे, धोक्यापासून इशारायंत्र, सोल्ड्रींग मशीन, पवनचक्की पासून ऊर्जा निर्मिती, सूर्यमाला, वॉटर पंप, थ्रीडी व्हिडिओ प्लेअर, कॅलिडोस्कोप, पाणी बचत यंत्र आदी वैज्ञानिक प्रतिकृती सादर करण्यात आल्या. सदरच्या विज्ञान प्रतिकृती सादरीकरण उपक्रमात कु.पियुष चव्हाण व सिद्धेश पेढांबकर यांनी सादर केलेल्या सूर्यमाला विज्ञान प्रतिकृतीने प्रथम क्रमांक संपादन केला. कु. श्रेया पावसकर व श्रेया नरळे विद्यार्थिनींनी वॉटर पंप ही प्रतिकृती सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला. तर कु. मीरा कोलकांड व जिनत मुजावर यांनी सादर केलेल्या थ्रीडी व्हिडिओ प्लेअर या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कु. प्रतिक शिंदे व अर्जुन थापा यांनी सादर केलेल्या कॅलिडोस्कोप या प्रतिकृतीला तसेच श्रीया नागेश हिने सादर केलेल्या हवेच्या दाबाने पाणी बचत यंत्र या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. याचे परीक्षण गणित शिक्षक श्री.डी.एस. निंभोरे यांनी केले. Science replication exhibition at Patpanhale School

