पारितोषिक वितरण; दि. २० रोजी स. ११ वा. माध्यमिक शाळा सेवक पतपेढी साळवीस्टॉप
रत्नागिरी, ता. 17 : जि.प. माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षी जिल्हा विज्ञान मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला असून प्राथमिक गटात गुहागर येथील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या आर्या मंदार गोयथळे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर माध्यमिक गटात वेळवी( ता.दापोली) येथील कै. गोविंदराव दळवी हायस्कूलची पायल शशिकांत वनगुले हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. Science entertainment exam Result

जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभाचे शुक्रवार दि. २० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता माध्यमिक शाळा सेवक पतपेढी साळवीस्टॉप येथे होणार आहे. तालुकास्तरावर व जिल्हास्तरावरील विजेत्यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, कोषाध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष आर.व्ही.जानकर, विज्ञान मंडळाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विज्ञान मंडळाचे सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. Science entertainment exam Result
जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धेचा निकाल
प्राथमिक गट– द्वितीय– आयुष संदिप कुंभार ( आचार्य नरेंद्रदेव विद्यामंदिर, भू , राजापूर), तृतीय – आदिती अमोल जाधव ( ज.ग.पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, लांजा), चतुर्थ- मिहिर उदय भाट्ये ( जि.प. शाळा देवरुख नं ४ , संगमेश्वर), साक्षी संजय आग्रे ( जि.प प्राथमिक शाळा कोंडखंडकर ,रत्नागिरी), पाचवा- संस्कृती दिनेश पाते- ( सरस्वती विद्यामंदिर जामसूत, गुहागर), उत्तेजनार्थ- सार्थक शिवाजी पाटील ( ए.जी हायस्कूल दापोली), श्लोक एकनाथ गावडे ( इंग्लिश मीडियम स्कूल सावर्डे), आर्य धनंजय दांडेकर ( फाटक हायस्कूल, रत्नागिरी) Science entertainment exam Result
माध्यमिक गट- द्वितीय – सिमरन विश्वास मांडवकर ( उर्मिला माने विद्यालय आसगे, लांजा), तृतीय- अली मुबारक फणसोपकर ( मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी), चतुर्थ- जानवी अनंत कानापडे ( न्यू इंग्लिश स्कूल, पाचाड शिरळ, चिपळूण), दिव्यश्री प्रभात पवार ( निर्मला भिडे जनता विद्यालय, कोंड्ये, राजापूर), पाचवा- सुजल सुरेश शिंदे ( नवभारत हायस्कूल, भरणे, खेड) उत्तेजनार्थ- निनाद राजेंद्र पेवेकर ( ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली), आफिया आसिफ इनामदार ( माध्यमिक विद्यालय दोणवली, चिपळूण), मंतशा फरहान कुडाळकर ( नवजीवन हायस्कूल राजापूर). Science entertainment exam Result