गुहागर, ता. 29 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये अंजनवेल केंद्राचा शाळा पूर्व मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रमुख श्री. अशोक गावणकर होते. School Preparatory Gathering at Veldur School

यावेळी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. शाळा पूर्व तयारी मेळाव्यामध्ये अनेक स्टॉलच्या माध्यमातून पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुखद अनुभव देण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रप्रमुख गावणकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे अतिशय उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले असून हा एक अविस्मरणीय क्षण आहे. प्राथमिक शिक्षण हाच खरा उच्च शिक्षणाचा पाया आहे. या चिमुकल्यांना बालस्नेही वातावरणामध्ये शाळेबाबत गोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. यातून शाळेचा गुणवत्तापूर्ण विकास होऊ शकतो. पालक वर्गाने या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले व अशाच प्रकारचे उपक्रम शाळेत आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. School Preparatory Gathering at Veldur School

या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आरडीसी बँकेचे माजी सहाय्यक व्यवस्थापक दुर्वास वनकर, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले, शिक्षण तज्ञ सदस्य शंकर कोळथरकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, युवा नेते संदीप वनकर, रवींद्र जांभरकर, जय गणेश नाटेकर, दिलीप पालशेतकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सानिया वनकर, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष ऋतुजा रोहीलकर, मुख्याध्यापक गणेश विचारे, मुख्याध्यापक स्नेहा गमरे, नवानगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, घरटवडी शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी, नदीम कोतवडेकर, अशपाक कुपे, मुजीब सर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक सौ. जोशी व मनोज पाटील व केंद्रातील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले. School Preparatory Gathering at Veldur School
