• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जि. प. गुहागर क्र. २ शाळेत व्यवस्थापन समितीची सभा

by Mayuresh Patnakar
June 26, 2026
in Guhagar
52 1
1
School Management Committee Meeting
102
SHARES
292
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : जिल्हा परिषद केंद्र शाळा, गुहागर क्र. २ येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा समितीचे अध्यक्ष श्री. गणेश तेलगडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला केंद्रप्रमुख मनोज पाटील, उपाध्यक्ष उर्वशी जांगळे, सचिव व मुख्याध्यापिका सौ. मनीषा शिंदे, शिक्षक प्रतिनिधी जुनेद शेख, लोंढे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. School Management Committee Meeting

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. विषयपत्रिकेतील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गणवेश, पाठ्यपुस्तके तसेच विविध शासकीय योजनांची माहिती सदस्यांना देण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ सदस्य म्हणून श्री. उमेश भोसले यांची, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून यश सांगळे व स्वर्णिता दास यांची, तर शाळा प्राधिकरण सदस्य म्हणून नगरसेविका सौ. तेलगडे यांची निवड करण्यात आली. सभेत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे तसेच शासनाच्या विविध योजनांबाबतही चर्चा झाली. सचिव व मुख्याध्यापिका सौ. मनीषा शिंदे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. School Management Committee Meeting

केंद्रप्रमुख मनोज पाटील यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. समितीच्या सहकार्याने शाळेच्या भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नव्या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शिक्षक व समिती सदस्यांना शुभेच्छा दिल्या. School Management Committee Meeting

अध्यक्ष श्री. गणेश तेलगडे यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोंढे मॅडम यांनी केले. School Management Committee Meeting

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSchool Management Committee Meetingटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share41SendTweet26
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.