अपसर्जनम फाऊंडेशन तर्फे पालशेत नं. १ शाळेस भेटवस्तू
गुहागर, ता.15 : तालुक्यातील जि. प.च्या पालशेत नं. १ आदर्श शाळेस अपसर्जनम फाऊंडेशन तर्फे (Apsarjanam Foundation) पुस्तकांच्या कपाटासह पुस्तकांची भेट देण्यात आली. माजी राष्ट्रपती स्व. भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून या भेटवस्तू देण्यात आल्या. School gift items by Apsarjanam Foundation

विद्यार्थी दशेच्या लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाची गोडी लागवी. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थेने घेतलेला पुढाकार, उचललेले पाऊल हे निश्चितच कौतुकास्पद आहे. इतरांनाही प्रेरणादायी आहे. या सामाजिक संस्थेचे शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. गुहागर गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे शिक्षण विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ यांनी शाळेचे अभिनंदन केले. व अपसर्जनम फाऊंडेशनच्या अध्यक्षा अंजली किरकिरे, विश्वस्त श्री. राजेश सोहनी, सहकारी, विश्वस्त, पदाधिकारी यांचे शाळा व्यवस्थापन समितीकडून आभार मानण्यात आले. School gift items by Apsarjanam Foundation

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतिश चव्हाण, उपाध्यक्ष प्रित पटेकर सर्व सदस्य मुख्याध्यापिका सौ. दर्शना समगिस्कर, उपशिक्षक श्री. संतोष गावडे उपशिक्षक श्री. बाबासाहेब राशिनकर, माता पालक संघ शिक्षक पालक संघ सर्व पालक बंधु भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. School gift items by Apsarjanam Foundation

