गुहागर ता. 18 : निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडीच्या वतीने दि. १६ जून रोजी शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी 75 विद्यार्थांना स्कूल बॅग देण्यात आल्या. School bag distribution by Nirmala XI team
गेली आठ ते दहा वर्ष दरवर्षी निर्मला इलेव्हन क्रिकेट संघाकडून तवसाळ तांबडवाडी शाळेसाठी वह्या वाटप करण्यात येतात. दोन वर्षापासून शाळा तवसाळ तांबडवाडी आणि बाबरवाडी या दोन्ही शाळेतील विद्यार्थांना शालेय स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ (तांबडवाडी) खूपच कौतुकास्पद उपक्रम राबवता आहेत. असेच उपक्रम प्रत्येक गावागावात जिल्हा परिषद शाळांमध्ये झालेच पाहिजे. आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा चालू राहिल्या पाहिजेत. आता सध्याच्या परिस्थितीत गावाकडील शाळा ह्या ओस पडू लागल्या आहेत. School bag distribution by Nirmala XI team
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.श्री.परवेझ चिपळूणकर सर (केंद्रप्रमुख), मा.श्री.नंदकुमार बेंद्रे साहेब, मा.सौ.प्रियांका सुर्वे मॅडम (सरपंच), मा.श्री.विजय मोहिते साहेब (शिक्षण समिती माजी अध्यक्ष), मा.श्री.निलेश सुर्वे साहेब, मा.श्री.शितप साहेब, मा.श्री.निलेश खामकर सर, मा.श्री.सुनील लाकडे सर, मा.श्री.जोगळेकर सर (मा. ल.भा. हेदवकर हेदवी हायस्कूल मुख्याध्यापक), मा.श्री.कोकाटे सर, मा.श्री.दत्ताराम जोगळे साहेब (समाजसेवक) मा.श्री. चंद्रकांत निवाते साहेब, मा.श्री.रमेश कुरटे साहेब(शिक्षण समिती अध्यक्ष), मा. सौ.निवाते मॅडम, मा.सौ.येद्रे मॅडम, मा.सौ.नम्रता निवाते(माजी सरपंच), मा.श्री.कृष्णा वाघे साहेब, मा.श्री.संदीप जोशी साहेब (माजी सरपंच) मा.श्री.शंकर येद्रे साहेब, मा.श्री.विजय नाचरे साहेब, मा.श्री.दीपक निवाते साहेब मा.श्री.अंकुर मोहिते सर (मुख्याध्यापक तवसाळ तांबडवाडी) तसेच वाडीतील सगळेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. School bag distribution by Nirmala XI team