रत्नागिरी, ता. 18 : जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे करिता पोलीस भरती प्रक्रिया बुधवार दिनांक १९/०६/२०२४ रोजी पासून रत्नागिरी घटकात होणार आहे. या भरती प्रक्रीयेबाबत केलेले नियोजन आणि इतर बाबींची माहिती देण्याकरिता दिनांक १७/०६/२०२४ रोजी दुपारी १३.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भरती संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली व शंकांचे निरसन करण्यात आले. या पत्रकार परिषदेमध्ये खालील महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. Ratnagiri District Police Recruitment
. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल.
. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx याद्वारे सूचना प्राप्त झाली असेल अश्या उमेदवारांना दुसरी तारीख रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून दिली जाईल.
. नमूद उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या तारखेमद्धे ४ दिवसांचे अंतर राहील व त्याच वेळी पुढील तारखा दिल्या जातील, याशिवाय उमेदवारांना काही अडचण / शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा”.
. “पोलीस भरती २०२२ – 20२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील.
. याबाबत काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्यांचे निरसन पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांचे मार्फत केले जाईल.
. दिनांक १९/०६/२०२४ व २०/०६/२०२४ रोजी प्रतिदिनी ३०० उमेदवार व दिनांक २१/०६/२०२४ ते १५/०७/२०२४ या कालावधीत प्रति दिनी सुमारे ५०० इतके उमेदवार मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमापे करीता सकाळी ०६.०० वा हजर राहण्यासाठी तयार करण्यात आलेले वेळापत्रक www.mahait.org याच्याकडे देण्यात आलेले आहेत त्यानुसार त्यांच्याकडून उमेदवारांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर शनिवार व रविवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
. उमेदवारांना पोलीस भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास नमूद हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष WhatsApp क्रमांक: ८८८८९०५०२२, पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, दुरध्वनी क्रमांक – ०२३५२-२७१२५७ व ईमेल sp.ratnagiri@mahapolice.gov.in, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई यांचे कार्यालय, दुरध्वनी क्रमांक – ०२२-२७५६३२५७, ईमेल – ig.kokanrange@mahapolice.gov.in
. पावसाळ्याचे दिवस असल्याने उमेदवारांनी पावसापासून आपला बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य जसे (रेनकोट, छत्री) आपल्या सोबत ठेवावी तसेच उमेदवारांनी स्वतःची कागदपत्रे पावसातून बचावाकरीता वॉटर प्रूफ बॅग वापरावी. Ratnagiri District Police Recruitment