गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा – मिनार पाटील
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालशेत – निवोशी ग्रां. पं. कार्यक्षेत्रातील बारभाई, निवोशी व काळे वठार प्राथमिक शाळांच्या शौचालय दुरुस्तीच्या कामामध्ये घोटाळा करण्यात आला आहे. हा गैरव्यवहार पालशेत ग्रा. पं. पदाधिकारी आणि पंचायत समिती अधिकारी तक्रार करून देखील याबाबत डोळेझाक करीत असल्याचा आरोप ग्रा. पं. सदस्य श्री. मिनार पाटील व ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. Scam in school toilet repair work
१५ वा वित्त आयोग ग्रा. पं. स्तर यामधून बरभाई प्राथमिक शाळेच्या शौचालय दुरुस्तीसाठी १ लाख १७ हजार १३९ रु, काळेवठार शाळेसाठी १ लाख ५२ हजार १९३ रु, निवोशी शाळेसाठी ३ लाख १९ हजार ७५२ रु. इतकी घसघशीत आर्थिक तरतूद ही केवळ दुरुस्तीसाठी करण्यात आली. तसे अंदाजपत्रक करण्यात आले. तरीही अंदाज पत्रकानुसार ही कामे नाहीत. त्यामध्ये तफावत आहे. अनेक कामांमध्ये अनावश्यक कामांचा समावेश करून काही कामांसाठी अवाजवी अपेक्षित खर्च अंदाज पत्रकामध्ये दाखविण्यात आला आहे. मूळचे काम तसेच ठेऊन केवळ बाहेरून रंग रंगोटी करून काही कामे रेटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मूल्यांकन मात्र अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात आले आहे. शाळांच्या शौचालय दुरुस्तीला इतका खर्च होऊ शकतो, हे सर्वसामान्य लोकांना आता या विकासकामांमध्ये करण्यात आलेल्या अंदाजपत्रकिय आर्थिक तरतुदीवरून दिसून येत आहे. Scam in school toilet repair work
मात्र, स्थानिक उच्च दर्जाचे बांधकाम व्यावसायिकांच्या अनुभवानुसार हा दाखविण्यात आलेला अंदाजपत्रकिय खर्च पेक्षा जास्त असावा असे म्हणणे आहे. संबंधित कामाच्या ठिकाणी काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आले. मात्र आक्षेप घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी विजेची व्यवस्था असताना दिवे बंद करून कोणी पाहू नये म्हणून चोरासारखे मोबाईल बॅटरीच्या मिणमिणत्या प्रकशामध्ये काम उरकण्याचा केविलवाणा प्रयत्न ठेकेदाराने केला आहे. Scam in school toilet repair work
निधी तरतुदीच्या कमतरतेमुळे गावाचा विकास अडचणीत येऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून थेट ग्राम पंचायतींना प्राप्त होणारा निधी संबंधित अधिकारी, ग्रा. पं. पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने विकास कामांना टक्केवारीचा फाळका लावला जातो. कामांची पाहणी न करता कामांचे अंतिम मूल्यांकन झाल्याचे या शौचालय दुरुस्ती कामात स्पष्ट होत असून मूल्यांकन झाल्यानंतरही काम पूर्ण झाल्याचा फलक संबंधित कामाच्या ठिकाणी लावण्यात आला आहे. पूर्वी लावण्यात आलेल्या फलकावरी तारखाही सोईनुसार बदलल्या जात आहेत. गटविकास अधिकारी श्री. राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप मिनार पाटील यांनी केला. या विकास कामांमध्ये झालेल्या गैव्यवहारप्रकरणी ठोस पुरावे दिल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी यांनी योग्य कार्यवाही ना केल्यास ग्रामस्थांसह गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मिनार पाटील यांनी या निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना दिला आहे. Scam in school toilet repair work