• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सवतसडा धबधबा व अडरे धरण पर्यटनाकरिता बंद

by Guhagar News
July 26, 2023
in Ratnagiri
103 1
3
Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism
202
SHARES
577
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी

गुहागर, ता. 26 : सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका पाहाता परशुराम घाटाच्या पायथ्यालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे येथील धरण पाणलोट क्षेत्र हे दोन पर्यटन स्थळे दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटनाकरिता बंद केले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आकाश लिंगडे यांनी दिली आहे. Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत परशुराम घाटातील सवतसडा हा धबधबा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. परंतु हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये सवतसडा धबधबा येथे अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह वाढून पर्यटनासाठी येणाऱ्या जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

तसेच अडरे येथील धरण पाणलोट क्षेत्रात पर्यटनासाठी लोकांची ये-जा होत असते. धरणाच्या पाण्याखाली अति उत्साही पर्यटक पाण्याच्या सांडव्याखाली भिजण्यासाठी उतरत असतात अशा वेळी पावसामुळे काही भाग निसरट झालेला असतो, तसेच अतिवृष्टीमुळे धरणाच्या सांडव्यावरून पाणी जास्त प्रमाणात वाहू लागते, अशा वेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटनासाठी या दोन्ही ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

Tags: Adare DamGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSavatsada FallsSavatsada Falls and Adare Dam are closed for tourismTourismTouristsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यापर्यटकपर्यटनमराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.