• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रांगोळीतून उमटले सावरकरांचे प्रेरणादायी प्रसंग

by Manoj Bavdhankar
May 24, 2023
in Ratnagiri
76 1
0
Savarkar's inspiring moments emerged from rangoli
149
SHARES
425
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 24 : रांगोळीच्या विविध छटांतून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतोय, गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले. स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. Savarkar’s inspiring moments emerged from rangoli

Savarkar's inspiring moments emerged from rangoli

स्वा. वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध भागांसह रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताह २१ मे ते २८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यात दुसऱ्या दिवशी आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वा. सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग स्पर्धकांनी रांगोळीतून साकारले. Savarkar’s inspiring moments emerged from rangoli

Savarkar's inspiring moments emerged from rangoli

शहरातील पतितपावन मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धकांनी वीर सावरकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग रांगोळीतून साकारताना सावरकर चारित्र्याची ओळख, अभ्यास याची चुणूक दाखवली. सकाळी १० ते ५ या वेळेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तर संध्याकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळवी, राजन फाळके, गौरांग आगाशे, मनोज पाटणकर, पतित पावन संस्थेचे मंदार खेडेकर, परीक्षक कला शिक्षक, चित्रकर नीलेश पावसकर, प्रसिद्ध रांगोळीकर राजू भातडे, रांगोळीकार प्रशांत राजीवले, कलाकार श्रीकांत ढालकर, समन्वयक रवींद्र भोवड, रांगोळी स्पर्धा संयोजक अनघा निकम-मगदुम, सहसंयोजक मंगेश मोभारकर, तनया शिवलकर, केशव भट आदी उपस्थित होते. Savarkar’s inspiring moments emerged from rangoli

या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून २८ मे रोजी वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित कार्यक्रमात याचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. पतितपावन मंदिरात रंगावली प्रदर्शन २८ मेपर्यंत सकाळी १० ते १ व दुपारी ३ ते ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. Savarkar’s inspiring moments emerged from rangoli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSavarkarSavarkar's inspiring moments emerged from rangoliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.