• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सावरकर विचार जागरण सप्ताह

by Guhagar News
May 25, 2023
in Ratnagiri
132 1
0
Savarkar Thought Awakening Week at Ratnagiri

वक्तृत्व स्पर्धेला शुभेच्छा देताना माजी नगरसेवक राजू तोडणकर. सोबत रवींद्र भोवड, तनया शिवलकर, राजेंद्र फाळके, डॉ. श्रीकृष्ण जोशी, अॅड. सरोज भाटकर

258
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांचे विचारांचे जागरण

रत्नागिरी, ता. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतीकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. सावरकरांची विविध पुस्तके, ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे जागरण केले पाहिजे. त्यांची जगप्रसिद्ध उडी असू दे किंवा भाषाशुद्धी, हिंदुत्वाचे विचार किंवा सर्वांना मंदिरांत प्रवेश हे सारे आजही त्यांच्या विचार, महान कार्याची साक्ष देतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धांतून सावरकरांचे विचार जागरूक राहतील, असा सूर ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उमटले. Savarkar Thought Awakening Week at Ratnagiri

Savarkar Thought Awakening Week at Ratnagiri

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. यानिमित्त  आज २४ मे रोजी सकाळी शहरातील विठ्ठल मंदिरात स्पर्धा झाली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी नगरसेवक राजू तोडणकर, संयोजक रवींद्र भोवड, राजेंद्र फाळके, तनया शिवलकर, भरत इदाते, साईजित शिवलकर, केशव भट, मंगेश मोभारकर यांच्यासह उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षक साहित्यिक, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी, अॅड. सरोज भाटकर यांनी केले. Savarkar Thought Awakening Week at Ratnagiri

स्वातंत्र्य, हिंदुत्व आणि मंदिर प्रवेश, इयत्ता आठवी ते दहावी या शालेय गटासाठी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वा. सावरकरांचे बालपण, सावरकरांचे चरित्र हे विषय दिले होते. खुल्या गटासाठी सावरकर आणि आजचा भारत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीतील सामाजिक सुधारणा आणि स्वा. सावरकरांचे हिंदुत्व असे विषय दिले होते. या दोन्ही गटांतील स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. शालेय गटातील विद्यार्थ्यांची तयारीसुद्धा चांगली होती. सावरकरांनी लहानपणी घेतलेली शपथ, विदेशी कपड्यांची होळी, जातींमध्ये विभागलेला हिंदु समाज एक होण्यासाठी केलेले कार्य, भागोजीशेठ कीर यांनी केलेली पतितपावन मंदिराची स्थापना याविषयी सर्वांनी मते मांडली. सावरकरांनी अंदमानात सहन केलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत केलेले सामाजिक कार्य, विज्ञान विचार, नाट्य, साहित्य लेखन याबाबतही विचार मांडले. Savarkar Thought Awakening Week at Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSavarkar Thought Awakening Week at RatnagiriUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.