बाबरी मशिद प्रकरणाच्या माजी पक्षकारांच्या घरी पोहोचले राम मंदिराचे मुख्य पुजारी
गुहागर, ता. 12 : राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बाबरी मशिदीचे पक्षकार असलेल्या इकबाल अन्सारी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. ईदच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास बाबरी मशिदीचे पक्षकार असलेल्या इकबाल अन्सारी यांच्या निवासस्थानी पोहोचले. याठिकाणी इकबाल अन्सारी यांनी राम मंदिराचे मुख्य पुजारी यांचे माळा घालून स्वागत केले. यासोबतच इकबाल अन्सारी यांच्या कुटुंबीयांनी राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा आशीर्वादही घेतला. इकबाल अंसारी आणि आचार्य सत्येंद्र दास यांनी एकमेकांना मिठी मारुन संपूर्ण देशाला हिंदू-मुस्लिम एकता आणि प्रेमाचा संदेश दिला. Satyendra Das met Iqbal Ansari
500 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर जानेवारी महिन्याच्या 22 तारखेला अयोध्येतील भव्य दिव्य सोहळ्याचं संपूर्ण जग साक्षीदार झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद हा संपूर्ण भारतात एक संवेदनशील विषय होता. न्यायालयाने तो विषय निकाली काढला आणि अखेर रामलला अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. यातच आता ईदच्या पवित्र सणावर गंगा-जमुनी संस्कृतीचे उदाहरण पुन्हा एकदा धार्मिक नगरी अयोध्येत दिसले. Satyendra Das met Iqbal Ansari
यावेळी राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी देशाला आवाहन केले की, हा सण प्रेमाने आणि परस्पर बंधुभावाने साजरा केला पाहिजे. आता देशात हिंदू आणि मुस्लिम एकमेकांशी जोडले गेले आहेत. जेव्हा बाबरी मशिदीचे प्रकरण न्यायालयात होते, तेव्हा इकबाल अन्सारी बाबरी मशिदीचे पक्षकार होते आणि मी राम मंदिराचा मुख्य पुजारी. तेव्हाही आम्ही दोघंही एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी व्हायचो. आज आम्ही इक्बाल अन्सारी यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. Satyendra Das met Iqbal Ansari
इकबाल अन्सारी यांनी सांगितले की, अयोध्या ही संतांची नगरी आहे. येथे संतांना पूज्य मानले गेले आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. आज ईदच्या निमित्ताने रामललाचे पहिले पुजारी आमच्या घरी आले आहेत. यावेळी आम्ही त्यांचे स्वागत केले. यावेळी हिंदू समाजातील लोक रामनवमीचा सण साजरा करत आहेत. अयोध्येत एकमेकांबद्दल बंधुभाव, आदर, सभ्यता आणि आदर आहे. याचप्रकारे लोकांनी राहायला हवं. समस्त देशवासियांना आवाहन आहे की, त्यांनी एकमेकांचे सण बंधुभावाने साजरे करावे. Satyendra Das met Iqbal Ansari