दि. 13 मे रोजी कमलाकर सभागृह, लोखंडे विभाग येथे विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 11 : किरण कला मंडळ, ग्रामस्थ व मुंबई लोखंडे विभागतर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. 13 मे 2023 रोजी कमलाकर सभागृह, खालचा पाट लोखंडे विभाग येथे घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे. Satyanarayana Pooja at Guhagar Kamlakar Hall

श्री सत्यनारायणाची महापूजेनिमित्त शनिवार दि. 13 मे 2023 रोजी स. 9.30 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दु. 12.30 वा. तिर्थप्रसाद व महिलांचे हळदी समारंभ, रात्रौ 9.30 वा. बुवा – संदिप नाटुस्कर, पखवाज संदेश हुमणे यांचे स्वरसाधना भजन मंडळ, मळण यांचे भजन. रात्रौ 10.30 वा. नुतन ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ किर्तनवाडी-गावडे विभाग, बुवा – विनायक जोशी, पखवाज – यश पानकर, अजित भडवलकर यांचे भजन तसेच फनी गेम्स् व वरीष्ठ नागरीकांचा सन्मान करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजेची विसर्जन मिरवणूक काढण्या येणार आहे. Satyanarayana Pooja at Guhagar Kamlakar Hall
तरी सर्वांनी उपस्थित राहून तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती किरण कला मंडळ, ग्रामस्थ व मुंबई लोखंडे विभागतर्फे करण्यात आली आहे. Satyanarayana Pooja at Guhagar Kamlakar Hall
