प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान खोडदे यांचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथील श्री.विनायक अनंत गुरव, श्री.संतोष अनंत गुरव यांच्या निवासस्थानी श्री.प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान खोडदे देऊळवाडी या देवस्थानाच्या संयुक्त विद्यमाने माघ शुद्ध .२ धर्मनाथ बीज नवनाथांची व गगनगिरी महाराज आणि सत्यनारायणाची महापूजा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या उपक्रमांचे आयोजन श्री .प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान कमिटी खोडदे देऊळवाडी, गुरव कुटुंबीयांनी आणि गगनगिरी महाराज भक्तगण यांनी केले होते. Satyanarayana Mahapuja at Khodde
यानिमित्ताने रविवार दिनांक ११/०२/२०२४ रोजी सकाळी ५. ३० प.पु.स्वामी गगनगिरी महाराज यांचे पुजन करुन काकड आरती घेण्यात आली. सकाळी ७ वाजता धर्मराज बीज नवनाथ यांची पुजा आणि श्री.सत्यनारायण महापुजा उत्साहात संपन्न झाली. दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता दिपप्रज्वलन आणि दिपोत्सव, सायंकाळी ६ . ३० वाजता महाआरती, सायंकाळी ७ वाजता कोतळूक उमदेवाडी भजनी महिला मंडळाचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ८ वाजता शिवने येथील श्री.संतोष मिस्त्री यांच्या संगितमय भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९ वाजता वेळणेश्वर येथील श्री.सत्यविनायक प्रासादिक भजन मंडळाचा संगितमय भजन, रात्रौ १०:०० वाजता शिवतेज भजन मंडळ खोडदे या स्थानिक भजन मंडळाचे भजन हे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. Satyanarayana Mahapuja at Khodde
यावेळी प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान कमिटी खोडदे देऊळवाडी या देवस्थानचे अध्यक्ष श्री.विनायक अनंत गुरव, श्री.संतोष अनंत गुरव, श्री.विलास गोविंद गुरव, सौ.कविता गुरव, सौ.सुहासिनी गुरव, सौ.संजना गुरव, सौ.प्रतिभा प्रकाश नलावडे, सौ.रश्मी साळवी, सौ.शेवंती गुरव, सौ.पुजा साळवी, सौ.मधुरा साळवी, श्री. संतोष बारक्या चव्हाण यांचेसह गुरव परिवार खोडदे देऊळवाडी आणि श्री.प.पु.स्वामीगगनगिरी महाराज भक्तगण यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या श्री सत्यनारायण महापूजेचा आणि गगनगिरी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ आबलोली – खोडदे पंचक्रोशीतील जनतेसह गुहागर तालुक्यातील जनतेने बहूसंख्येने उपस्थित राहून घेतला. Satyanarayana Mahapuja at Khodde