गुहागर, ता. 15 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर तालुक्यातील पिंपरच्या सरपंच सौ. मोरे व वेळणेश्वर गटाचे उपविभागप्रमुख श्री. उदय मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. Sarpanch of Pimpar joins Shiv Sena

पिंपर गावात शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून उदय मोरे यांची ओळख आहे. गावातील कोणताही विषय असो, त्याठिकाणी आक्रमकपणे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच पुढे राहिले आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे असंख्य कार्यकर्ते त्यांना जोडले गेले आहेत. गावाच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून ते शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत. Sarpanch of Pimpar joins Shiv Sena

