शृंगारतळी येथील बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमात
गुहागर, ता. 16 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये खास गुहागर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमांमध्ये जवळजवळ 40 पेक्षा अधिक गावातल्या सरपंचांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. Sarpanch felicitated by Brahmakumaris

यावेळी आदरणीय सुनंदा दीदींनी खूप सुंदर पद्धतीने सर्व सरपंचांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आपल्या गावाच्या विकासाबरोबरच स्वतःचाही विकास आणि त्याचबरोबर गावकऱ्यांचाही विकास व्हावा. अनेक जण व्यसनमुक्त बनावे तणाव मुक्त बनावेत यासाठी ब्रह्माकुमारी विद्यालय खूप सुंदर पद्धतीने कसं कार्य करत आहे हे त्यांनी स्पष्ट केले . सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री चैतन्य धोपावकर यांनीही ब्रह्माकुमारीच्या कार्याचे कौतुक केले. राजयोगाची अनुभूती शारदा बहनजी यांनी करवली विद्यालयाचा परिचय सारिका बहनजीनी केला. Sarpanch felicitated by Brahmakumaris
यावेळी सर्व उपस्थित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार सुनंदा दीदी शारदा बहनजी, दीपा बहनजी, शिल्पा बहनजी यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोल्हापूरहून आलेल्या रघुनाथ भाईंनी केले. Sarpanch felicitated by Brahmakumaris

